नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या चार दिवसात एक हजार पेक्षा अधिक रुग्ण संख्या वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारीदेखील बाधित होत असल्याने जिल्हा परिषद सुनी पडली आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना तपासणी केली जात आहे. यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेतील ३०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली आहे. त्यात १५ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे.
बाधित कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात रवानगी जिल्हा परिषदेतील बाधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी लक्षणे नसलेल्या बाधितांना गृह विलगीकरण साठी पाठविण्यात आले तर लक्षणे असलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात अथवा खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा - सचिन वाझे प्रकरण : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून आणखी एक जण ताब्यात