नंदुरबार - जिल्ह्यातील चार पैकी तीन मतदारसंघात काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार के सी पाडवी तर शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार पद्माकर वळवी सोलापूर विधानसभा मतदारसंघातून शिरीष नाईक यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
हेही वाचा - नंदुरबार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित बंडखोरीच्या मार्गावर
जिल्ह्यातील आदिवासी तरुणांचे प्रश्न आरोग्याच्या समस्या बेरोजगारी आदी विषयांना समोर ठेवून आपण ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती शिरीष नाईक पद्माकर वळवी यांनी दिली. पद्माकर वळवी तीन तारखेला शक्तिप्रदर्शन करत आपली उमेदवारी जाहीर करणार आहेत. नवापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शिरीष नाईक हे 4 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस पक्षाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात पोहोचले असून जनता काँग्रेसच्या पाठीशी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नंदुरबार विधानसभा क्षेत्रात अद्याप कुठलाही उमेदवार जाहीर न करण्यात आल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
हेही वाचा - राजेंद्रकुमार गावित देणार राष्ट्रवादीला 'सोडचिठ्ठी'