ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये पावसाची शक्यता; मिरची व कापूस खरेदी बंद

author img

By

Published : Dec 11, 2020, 9:52 AM IST

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मिरचीची खरेदी व विक्री होत असते. शहरात मोठ्या प्रमाणावर तिच्या पथारी आहेत. तुरळक झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. मिळेल त्या साधनांनी मिरची एकत्र करून तिला गोळा करून झाकण्यात आले.

Chilli and cotton purchase stopped in Nandurbar
नंदुरबारमध्ये पावसाची शक्यता; मिरची व कापूस खरेदी बंद

नंदुरबार - जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने हवामान खात्याने येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतील मिरची विक्री बंद राहील, त्याचप्रमाणे राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र पुढील सूचना येईपर्यंत बंद राहील, अशी माहिती बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी दिली.

नंदुरबारमध्ये मिरची व कापूस खरेदी बंद

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण व तुरळक पाऊस होत असल्याने नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मिरची खरेदी व विक्री पुढील सूचना येईपर्यंत बंद राहील. तसेच बाजार समितीचे व्यवहार सुरळीत झाल्यानंतर शेतकऱ्यांना याबाबत कळवण्यात येईल. पुढील सूचना येईपर्यंत शेतकऱ्यांनी मिरची बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये, अशी माहिती बाजार समितीचे सचिव यांनी दिली.

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मिरचीची खरेदी व विक्री होत असते. शहरात मोठ्या प्रमाणावर तिच्या पथारी आहेत. तुरळक झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. मिळेल त्या साधनांनी मिरची एकत्र करून तिला गोळा करून झाकण्यात आले.

सीसीआय कापूस खरेदी बंद -

कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र ढगाळ वातावरणामुळे बंद राहील. त्याचबरोबर पुढील सूचना येईपर्यंत शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणू नये, असे आव्हान सीसीआय मार्फत करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता -

राज्यात काही दिवसात अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता असून दि.११ ते १४ डिसेंबरदरम्यान उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच पुढील दोन महिन्यात एक आठवडाभर थंड वारे वाहणार आहे. बदलत्या हवामानामुळे राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसात उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगांव या जिल्ह्यात जोरदार पाऊस तर नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.