ETV Bharat / state

महाराष्ट्रात महापूर : धुळे, नंदुरबारमधील महाजनादेश यात्रा स्थगित - Flood news

पूर स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी नंदुरबारचा दौरा रद्द केला असल्याची माहिती पालक मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Aug 8, 2019, 4:13 PM IST

Updated : Aug 8, 2019, 5:16 PM IST

नंदुरबार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाजनादेश यात्रा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी धुळे आणि नंदुरबारचा दौरा रद्द केला असल्याची माहिती पालक मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी 1 ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा सुरू केली होती. त्याचा पहिल्या टप्प्यातील समारोप नंदुरबार येथे शुक्रवारी होणार होता. परंतु, गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

नंदुरबारमधील महाजनादेश यात्रा स्थगित

यावेळी नंदुरबारमधील मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावीत, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, धडगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विजय पराडके या जिल्ह्यातील बड्या नेत्यांसह अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केल्यामुळे या नेत्यांचा भाजप प्रवेश हुकला आहे.

Intro:Anchor :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी एक ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा सुरू केली होती त्याचा पहिल्या टप्प्यातील समारोप नंदुरबार येथे शुक्रवारी होणार होता, परंतु गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी नंदुरबार चा दौरा रद्द केल्या असल्याची माहिती जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.Body:उद्या शुक्रवारी 9 ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त मुख्यमंत्री आदिवासी जनतेला संबोधित करण्यासाठी येणार होते त्यासाठी नंदुरबार आणि शहादा येथे दोन जाहीर सभा आयोजीत करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावीत, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, धडगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विजय पराडके या जिल्ह्यातील बड्या नेत्यांसह अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांचा समोर भाजपात प्रवेश करणार होते. परंतु महाराष्ट्रातील पूर स्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केल्यामुळे या नेत्यांचा बीजेपी प्रवेश हुकला आहे.Conclusion:Byte जयकुमार रावल - पालक मंत्री नंदुरबार.
Last Updated : Aug 8, 2019, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.