नंदुरबार Chandrashekhar Bawankule : भाजपाचं 'घर चलो' अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात सुपर वॉरियर्स बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधत असतांना त्यांनी मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील (Jarange Patil) यांनी भुजबळांच्या भाजपा प्रवेशाच्या केलेल्या आरोपांचा खुलासा केलाय. त्याचबरोबर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपाचे खंडन केलं. शिंदे सरकार 2024 पर्यंत सत्तेत राहील, असा दावा देखील त्यांनी यावेळी केलाय.
छगन भुजबळ यांना कोणतीही ऑफर नाही : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) किंवा भाजपा पक्षाकडून छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) कुठल्याही प्रकारची पक्षप्रवाशाची ऑफर देण्यात आलेली नाही. पक्षाचा प्रमुख म्हणून ईश्वर साक्ष सांगतो की, ते सत्याधारी पक्षात असताना त्यांनी भाजपात का प्रवेश करावा हा एक मोठा प्रश्न आहे. भाजपा पक्षाकडून भुजबळांची अशी कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, किंवा भुजबळांकडूनही असा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं स्पष्टीकरण भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिलंय.
मराठा नेत्यांना दिला सल्ला : आरक्षणाच्या संदर्भात जाती, जातींमध्ये तेढ निर्माण होणं योग्य नसून, मराठ्यांनी स्वतंत्र आरक्षण घेतल्यास त्यांना 16 ते 17 टक्के आरक्षणाचा फायदा मिळेल. ओबीसीतून आरक्षण घेतल्यास मिळणारा फायदा किती राहील, इतक्या 351 जातींमध्ये आरक्षणाची टक्केवारी किती येईल हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी मराठा समाजाच्या सर्वपक्षीय चाळीस-पन्नास नेत्यांनी एकत्र बसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी चर्चा करावी. तसेच मराठ्यांना जास्तीत जास्त आरक्षण कसं मिळवून देता येईल याचा विचार करावा, असा सल्लाही मराठा नेत्यांना बावनकुळे यांनी दिलाय.
मकाऊ दौऱ्याबाबत राऊतांच्या आरोपाचा केला खुलासा : मकाऊच्या पारीवारीक दौऱ्याचे राजकारण करणं वेदनादायक असून जे कोट्यावधीच्या खर्चांची भाष्य करत आहे. त्यांनाच कोट्यावधी विदेशात कसे पाठवता आणि खर्च करता याची माहीती असेल, असा पलटवार बावनकुळे यांनी मकाऊ दौऱ्यावरून आरोप करणाऱ्यांवर केला आहे. या विषयावर मी वारंवार स्पष्टीकरण देणं योग्य नाही. या देशातून इमिग्रेशन मधून एक लाख नेणं त्रासदायक आहे. त्यामुळं मकाऊमध्ये खर्च करण्यासाठी लाखो रुपये कसे घेवून जाता येईल आणि माझा मकाऊ मध्ये कोणी मित्र नाही, हव तर संजय राऊतांनी तपासून पहाव. असा टोला देखील बावनकुळे यांनी लगावला.
आमदार अपात्रतेबाबत सुनावणी संविधानिक बाब : आमदार अपात्रतेबाबत सुरु असलेली सुनावणी संविधानिक बाब आहे. यावर आपण बोलणं आणि कोणीही टिका टिप्पणी करणं अयोग्य असल्याचं मत बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. तर अपात्र होणारे सर्व आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार हे भाजपात प्रवेश करतील, यावर बोलतांना बावनकुळे यांनी यावर मी काय बोलावं असं म्हणत 2024 मध्ये महायुतीचे 225 आमदार आणि 45 खासदार निवडून येतील असा विश्वास दाखवला.
सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे. सुप्रिम कोर्टात महाविकास आघाडीच आरक्षण टिकवू शकली नाही असा आरोप करत, बावनकुळेंनी कोणत्याही समाजाचे आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भुमिका सरकरीची आहे.
फडवणीस मुख्यमंत्री व्हावे त्यांच्या भावना : भाजपाच्या कार्यकर्त्यांना फडवणीस मुख्यमंत्री व्हावे त्यांच्या भावना यात काय गैर नाही. तर एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना वाटत त्यांनी मुख्यमंत्री व्हाव यातपण काही गैर नाही. या प्रश्नावरुन वाद करण्याची गरज नाही जे ठरत ते पार्लामेटरी बोर्डात ठरतं. मात्र भाजपा कार्यकर्त्यांची देवेद्र फडवणीस मुख्यमंत्री व्हावे ही प्रबळ इच्छा असल्याचं बावनकुळे म्हणालेत. तर विधानसभा महायुतीबाबत अनिश्चता आहे असं देवेंद्र फडवणीस बोलले नाहीत. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेसाठी महायुतीच असले. 2024 पर्यत शिंदेच मुख्यमंत्री राहतील अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
हेही वाचा -
Chandrashekhar Bawankule : मराठा आरक्षण; चंद्रशेखर बावनकुळेंकडून छगन भुजबळांची पाठराखण