ETV Bharat / state

नंदुरबार विधान परिषद निवडणूक : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे यश

धुळे-नंदुरबार जिल्हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाची हवा असताना काही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. विधान परिषदेच्या इतिहासातही काँग्रेसची एकाधिकारशाही कायम होती. मात्र या निवडणुकीत काँग्रेसच्या हातून विधान परिषदेची जागा भाजपाने हिसकावून घेतली आहे.

नंदुरबार
नंदुरबार
author img

By

Published : Dec 4, 2020, 3:53 PM IST

धुळे - नंदुरबार विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा करिष्मा चालला नसून सलग तिसऱ्यांदा विधानपरिषदेत जाण्याची अमरीश पटेल यांना संधी मिळाली आहे. गेल्या तीस वर्षांपासून काँग्रेसकडे असलेली विधान परिषदेची जागा भाजपाने हिसकावून घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.

धुळे-नंदुरबार जिल्हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाची हवा असताना काही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. विधान परिषदेच्या इतिहासातही काँग्रेसची एकाधिकारशाही कायम होती. मात्र या निवडणुकीत काँग्रेसच्या हातून विधान परिषदेची जागा भाजपाने हिसकावून घेतली आहे. प्रथमच विधान परिषदेची जागा भाजपाला अमरीश पटेल यांच्या रूपाने मिळाली. पटेल हे सलग तिसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून काँग्रेसचा उमेदवार या जागेवर एकतर्फी विजयी होत होता. त्यात नंदुरबारचे भटेसिंग रघुवंशी हे सलग दोन वेळा काँग्रेसतर्फे आमदार होते. त्यानंतर सलग दोन टर्म त्यांचे चिरंजीव चंद्रकांत रघुवंशी यांना संधी मिळाली होती. गेल्या 2 टर्मपासून या मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी काँग्रेसकडून पटेल यांना मिळाली होती.

2009मध्ये काँग्रेसकडून मिळाली संधी

शिरपूर विधानसभेची जागा आरक्षित झाल्याने सर्वात अगोदर सन 2009मध्ये काँग्रेसकडून पटेल यांना विधान परिषदेत संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात युतीतर्फे धुळ्याचे माजी महापौर भगवान करनकाळ यांना संधी देण्यात आली होती. 2015मध्ये झालेल्या निवडणुकीत अमरीश पटेल यांच्या विरोधात भाजपातर्फे तळोदा येथील शशिकांत वाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यावेळी युतीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने पटेल यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला.

सत्ता मंत्रीपद असून आघाडीला अपयश

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आहे. धुळ्याचे पालकमंत्री शिवसेनेचे अब्दुल सत्तार, नंदुरबारचे पालकमंत्री के. सी. पाडवी, काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील, पद्माकर वळवी, शिवसेनेचे आमदार मंजुळा गावित, चंद्रकांत रघुवंशी हे नेते महाविकासआघाडीकडे होते तसेच भाजपाचे साथ सोडून राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी आमदार अनिल गोटे यांचेही पाठबळ असतांना आघाडीचा मात्र विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला.

ही आहेत पराभवाची कारणे

धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे धुळे नंदुरबार दोन्ही जिल्ह्यांमध्ये महा विकास आघाडीकडे उत्तम संख्याबळ असूनही असलेला समन्वयाचा अभाव तसेच येथील स्थानिक नेत्यांमध्ये असलेले दुराव्याचे संबंध हीच पराभवाची खरी कारणे समजली जातात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.