नंदुरबार - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांच्याविरोधात रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याने विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र ही तक्रार खोटी असल्याचा आरोप करत जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
महिला कर्मचाऱ्याने दाखल केलेली तक्रार खोटी आहे. पोलिसांनी कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले आहे. चोवीस तासात दाखल केलेला गुन्हा मागे घेतला नाही, तर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
काम बंद आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामाला राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा कर्मचारी संघटनानी दिला आहे. जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.