ETV Bharat / state

नवापूर तालुक्यातील वागदी गावात ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव पास

सोमवारी वागदी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेऊन दारुबंदीवर एकमताने ठराव पास करण्यात आला. २२ जुलै २०१९ पासून गावात दारूबंदी होणार, असा ठराव पास करण्यात आला.

ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव पास
author img

By

Published : Jul 23, 2019, 9:00 AM IST

Updated : Jul 23, 2019, 1:32 PM IST

नंदुरबार - वागदी हे नवापूर तालुक्यातील डोंगर पायथ्याशी असलेले गाव आहे. सोमवारी वागदी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेऊन दारुबंदीवर एकमताने ठराव पास करण्यात आला. २२ जुलै २०१९ पासून गावात दारूबंदी होणार, असा ठराव पास करण्यात आला. ग्रामसभेमध्ये वारंवार गावातील महिला बचत गटांद्वारे गावात दारूबंदी करावी, असा विषय मांडला जात होता. त्यावर गावातील सर्व नागरिक, सरपंच, सदस्य, पोलीस पाटील यांच्याशी संवाद साधून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

वागदी गावात ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव पास

गावातील महिला, पुरुष व ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांच्या उपस्थितीत एकमताने दारुबंदीचा ठराव पास करण्यात आला. गावात १०० टक्के देशी दारू, सट्टा, जुगार, बंद राहतील असे स्पष्ट करण्यात आले. गावात दारूची तस्करी करणारी वाहने किंवा शेतात व जंगलात जाऊन दारू तयार करताना आढळल्यास पेसा (PESA) कायद्याअंतर्गत कारवाई करून दंड आकारण्यात येणार आहे. वागदी गावातील महिला बचत गट आणि ग्रामपंचायतीने एकत्र येऊन दारूबंदी सारखा चांगला निर्णय घेत गावाला विकासाची दिशा दाखवली आहे.

Intro:नवापुर तालुक्यातील वागदी गावात दारुबंदीवर ग्रामसभेत ठराव पास...Body:Anchor :- नवापुर तालुक्यातील शेवटचे डोंगराच्या पायथ्याशी असलेलं वागदी हे गाव सोमवारी वागदी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेऊन दारुबंदीवर एकमताने ठराव पास करून २२ जुलै २०२९ पासून गावात दारूबंदी राहणार असा निर्णय जाहीर करण्यात आला. ग्रामसभेमध्ये वारंवार गावातील महिला बचत गटाद्वारे गावात दारूबंदी व्हावी असा विषय मांडला जात होता त्यावर गावातील सर्व नागरिक, सरपंच, सदस्य, पोलीस पाटील यांच्याशी संवाद साधून ग्रामसभेचे आयोजन करून महिला पुरुष व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत एकमताने ठराव पास करून गावात १००% देशी दारू, सट्टा, जुगार, बंद राहतील असे स्पष्ट करण्यात आले. गावात दारूची तस्करी करणारे वाहने किंवा शेतात व जंगलात जाऊन दारू तयार करताना आढळल्यास पेसा कायद्याअंतर्गत कारवाई करून दंड आकारण्यात येणार आहे तसेच गावातील व्यक्तीने दुसऱ्या गावात जाऊन दारू प्यायल्यावर त्याठिकाणी भांडण झाल्यास गावातील पुढारी त्याला जबाबदार राहणार नाही त्याची वैयक्तिक जबाबदारी राहील असे दारू पिणार्‍यांना आदेश देण्यात आले आहे. वागदी गावातील महिलांनी बचत गटांद्वारे एकत्र येऊन दारूबंदी सारखा चांगला निर्णय गावाला मिळवून देत विकासाकडे दिशा दाखवली आहे.Conclusion:Byte :- किसन गावित - सरपंच वागदी ग्रामपंचायत
Last Updated : Jul 23, 2019, 1:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.