नंदुरबार - येथील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत काँग्रेसचे के. सी. पाडवी दोन हजार मतांनी विजय झाले आहेत. शिवसेनेचा आमश्या पाडवी यांनी त्यांच्यासमोर मोठ आव्हान उभे केले होते.
हेही वाचा- यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या नेत्यांची बंडखोरी सपशेल फेल
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत काँग्रेसचे के. सी. पाडवी यांना निसटता विजय मिळाला. त्यांच्यासमोर शिवसेनेचा आमश्या पाडवी यांनी मोठे आव्हान उभ केले होते. त्याचप्रमाणे भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार नागेश पाडवी देखील झुंज देत तिसर्या क्रमांकावर गेले. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ होता. २३ व्या फेरीतपर्यंत शिवसेनेचे आमश्या पाडवी पुढे होते. २४ व्या फेरीत काँग्रेसचे के. सी. पाडवी यांनी ९१३ मतांची आघाडी घेतली. २५ व्या फेरीत २०९६ मतांनी काँग्रेसचे के. सी. पाडवी विजयी झाले. सातव्यांदा त्यांना याच मतदारसंघातून निवडून दिल्याने त्यांनी हा मतदारांचा विजय असल्याचे सांगीतले.