ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : आदिवासी विकास विभागाच्या एक्सपायर दूध वाटप प्रकरणी स्वयंपाकगृह चालक संस्थेला तंबी - expired milk distribution

पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आदिवासी विकास विभागाच्या केंद्रीय स्वयंपाकगृहातून  झालेल्या संशयास्पद दूध पुरवठ्याबाबत संबंधित ठेकेदाराला तंबी देत कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच, प्रकल्पाधिकारी जितेंद्र डोडी यांनीही केंद्रीय स्वयंपाकगृहाला भेट देऊन तपासणी केली.

आदिवासी विकास विभागाच्या एक्सपायर दुध वाटप प्रकरणी स्वयंपाकगृह चालक संस्थेला तंबी
author img

By

Published : Jul 25, 2019, 8:29 PM IST

नंदुरबार - पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आदिवासी विकास विभागाच्या केंद्रिय स्वयंपाकगृहातून झालेल्या संशयास्पद दूध पुरवठ्याबाबत संबंधित ठेकेदाराला तंबी देत कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच, प्रकल्पाधिकारी जितेंद्र डोडी यांनीही केंद्रीय स्वयंपाकगृहाला भेट देऊन तपासणी केली.

आदिवासी विकास विभागाच्या एक्सपायर दूध वाटप प्रकरणी स्वयंपाकगृह चालक संस्थेला तंबी

जितेंद्र डोडी यांनी स्वत: केंद्रीय स्वयंपाकगृहातल्या दुधाचे फॅट तपासून पाहिले. यापुढे स्वयंपाकगृहातून फक्त अमुल कंपनीचे दूध वितरीत करण्याचे आदेशही त्यांनी स्वयंपाकगृहाची चालक असलेल्या स्त्री शक्ती संस्थेला दिले आहेत. केंद्रीय स्वयंपाकगृहामधील प्रयोगशाळेत दररोज अन्नाची तपासणी करुन त्याचा अहवाल कार्यालयात सादर करण्याचा आदेश त्यांनी यावेळी संस्थेला दिला.

आदिवासी विकास विभागाच्या केंद्रीय स्वयंपाकगृहातून हजारो विद्यार्थ्यांना एक्सपायर झालेल्या दुधाच्या पिशव्या वितरीत करण्यात आल्याची घटना ईटीव्ही भारतने उघडकीस आणली होती. तिचाच हवाला देत आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेकांनी या विषयावर कारवाईची मागणी केल्याने अखेर प्रशासनाला जाग आली आहे.

Intro:नंदुरबार, आदिवासी विकास विभागाच्या सेंट्रल किचन मधुन झालेल्या संशयास्पद दुध पुरवठ्याचा बाबत संबंधीत ठेकेदाराला तंबी देत या प्रकरणी चौकशी करुन कठोर कारवाईचे आश्वासन पालकमंत्री जयुकमार रावल यांनी दिले आहे. Body:दरम्यान आज प्रकल्पाधिकारी जितेंद्र डोडी यांनी सेंट्रल किचनला भेट देत, सर्व तपासणी केली. त्यांनी सेट्रल किचन मधल्या दुध स्वत पित तपासुन पाहीले. यापुढे सेंट्रल किचन मधुन फक्त अमुल कंपनीचेच दुध वितरीत करण्याचे आदेश त्यांनी सेंट्रल किचन चालक संस्थेला दिले आहे. आणि सेंट्रल किचन मधल्या प्रयोगशाळेत दररोजच्या अन्नाची तपासणी करुन त्याचे रोजचे अहवाल आपल्या कार्यालयात सादर करण्याचे आदेश देखील त्यांनी स्त्री शक्ती संस्थेला दिले आहेत. Conclusion:या सेंट्रल किचन मधुन हजारो विद्यार्थ्याना उत्पादन दुध आणि एक्सपायरी तारीख छापलेल्या दुधाच्या पिशव्या वितरीत झाल्या असल्याची बातमी ईटीव्ही भारतने सर्वात प्रथम मांडली होती. तिचाच हवाला देत आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेकांनी या विषयावर कारवाईची मागणी केल्याने ईटीव्ही भारतच्या दणक्याने अखेर प्रशासनाला जाग आली आहे.

Byte जयकुमार रावल पालकमंत्री नंदूरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.