नंदुरबार - आदिवासी टायगर सेनेतर्फे जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊवन जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे टायगर सेनेचे सर्व कार्यकर्ते भरपावसात उपोषणाला बसले आहेत.
वाचा - औरंगाबादमध्ये शिक्षकांच्या मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलन
टायगर सेनेच्यावतीने, नवापूर तालुक्यातील तारापूर ग्रामपंचायतीची 2011 ते 18 या कालावधीत झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी. तळोदा तालुक्यातील मोबाईल युनिटमधील दोषी अधिकारी मोकाट आहेत, त्यांना अटक करण्यात यावी. नंदुरबार जिल्ह्यातील बोगस डॉक्टर्स मोहीम पुन्हा सुरू करून कारवाई करावी, घरकुल घोटाळा प्रकरणी संबोधित आधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आदी मागण्यासाठी साखळी उपोषण करण्यात आले.