ETV Bharat / state

नंदुरबार शहर कोरोनामुक्त! चौघांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात दिला डिस्चार्ज - कोरोना अपडेटेड न्यूज

जिल्ह्यातील पहिला रुग्ण नंदुरबार शहरात 17 एप्रिल रोजी आढळून आला होता. कोरोनाबाधित रुग्णाला उपचाराखाली आणल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनाही क्वॉरंटाईन करण्यात आले होते. उपचारानंतर त्या चौघांनी कोरोनावर विजय मिळवला असून त्यांना जिल्हा रुग्णालयातून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

नंदुरबार शहर कोरोनामुक्त
नंदुरबार शहर कोरोनामुक्त
author img

By

Published : May 6, 2020, 11:45 AM IST

Updated : May 6, 2020, 12:57 PM IST

नंदुरबार - नंदुरबार शहरवासियांसाठी आनंदाची बातमी असून शहरातील चारही कोरोनाबाधित उपचारानंतर कोरोनापासून मुक्त झाले आहेत. त्यांच्या तपासणीचे तिन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांना टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात येणार आहे.

कोरोनामुक्त चौघांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात दिला डिस्चार्ज

जिल्ह्यातील पहिला रुग्ण नंदुरबार शहरात 17 एप्रिल रोजी आढळून आला होता. कोरोनाबाधित रुग्णाला उपचाराखाली आणल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनाही क्वॉरंटाईन करण्यात आले होते. कोरोनाबाधिताची आई, मुलगा व मुलगी यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे शहरात कोरोना रुग्णांची संख्या चार झाली होती. नंदुरबार शहरात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे शहरवासीय चिंताग्रस्त होते. आता, मात्र आनंदाची बातमी असून चारही कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

पहिल्या कोरोनाबाधिताचे चार रिपोर्ट तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोन पॉझिटिव्ह तर दोन निगेटिव्ह आले आहेत. त्यांच्या नातेवाईकांचे प्रत्येकी तीन नमुने तपासणीसाठी गेले होते. त्यांचे तिन्ही नमुने निगेटिव्ह आले आहेत. यामुळे ते चारही जण कोरोनामुक्त झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्या चौघांनी कोरोनावर विजय मिळवला असून त्यांना बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयातून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील 39 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यात नंदुरबार तालुक्यातील नटावद येथील बाधिताच्या कुटुंबियांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासन खबरदारी घेत त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेऊन क्वॉरंटाईन करत आहे. क्वॉरंटाईन केलेल्या व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. जिल्ह्यातील 39 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यात नटावद येथील एका बाधिताच्या कुटुंबियांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. या अहवालात जिल्हा रुग्णालयात व आरोग्य विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 19 कोरोनाबाधित असून त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेण्यासह सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागाकडून ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे. प्रतिबंधित क्षेत्रात वेळोवेळी निर्जंतुकीकरण फवारणी सुरू आहे. जिल्ह्यात 680 पैकी 19 पॉझिटिव्ह रुग्ण असून 552 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, एकाचा बळी गेला आहे. 107 व्यक्तींचे अहवाल प्रतिक्षेत असून मंगळवारी नव्याने 24 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आयसोलेशन वॉर्डमध्ये 124 व्यक्ती असून क्वॉरंटाईनमध्ये 388 तर 40 व्यक्ती होम क्वॉरंटाईन आहेत. वॉर्ड अ‍ॅडमिट स्वॅब व्यक्ती असून 119 रुग्णालयाचे कर्मचारी आहेत.

Last Updated : May 6, 2020, 12:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.