नंदुरबार - जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर विधानसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी 9 उमेदवारांचे अर्ज छाननी नंतर बाद ठरवण्यात आले आहेत. यामुळे आता नंदुरबारमध्ये एकूण चार विधानसभा मतदारसंघात मिळवून 36 जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आले. दरम्यान रविवारी छाननीसाठी चारही ठिकाणच्या तहसिल कार्यालयात उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.
नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भाजपातर्फे डॉ. विजयकुमार गावित यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले उदेसिंग पाडवी यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली तर उदेसिंग पाडवी यांनी विजयकुमार गावित यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. छाननी अंती दोन्ही अर्ज वैध ठरवण्यात आले. छाननीच्या वेळी नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हिना गावित व काँग्रेस पक्षातर्फे के सी पाडवी यांच्यासह दोन्ही पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते. नंदुरबार विधानसभेतील एकूण 8 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती थविल व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी छाननी प्रक्रिया पूर्ण केली.
हेही वाचा... विधानसभा निवडणूक 2019 : 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध, आता लक्ष माघारीकडे
जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातील 3 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले, तर 10 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी राहुल पाटील, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी हरीष भामरे यांनी छाननी प्रक्रिया पार पाडली.
हेही वाचा... MAHA VIDHAN SABHA : आघाडीची सत्ता संपुष्टात.. युतीचे 'कमबॅक', लाखोंचे 'मराठा' मार्चे अन् भीमा-कोरेगाव दंगल
शहादा विधानसभा मतदार संघातील एका उमेदवाराचे अर्ज बाद करण्यात आला. एकूण 6 उमेदवारांचे नामांकने वैध ठरविण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.चेतन गिरासे, शहाद्याचे तहसिलदार मिलिंद कुलकर्णी, तळोद्याचे तहसिलदार पंकज लोखंडे, संपर्क अधिकारी भूपेंद्र बेडसे उपस्थित होते. नवापूर विधानसभा मतदार संघातील 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून 12 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी आनंद प्रक्रिया पूर्ण केली.
हेही वाचा... नांदेड जिल्ह्यातील विविध मतदारसंघात 'मनधरणी' काउंटडाऊन सुरू