ETV Bharat / state

नंदुरबार : गुजरातमधून वाळू वाहतूक करणारे 25 ट्रक जप्त

जिल्हाबंदी असतानाही गुजरातमधील वाळू वाहतूक करणारे ट्रक नवापूर मार्गे ये-जा करत होते. असे 25 ट्रक नवापूर पोलिसांनी जप्त केले आहेत.

seized truck
जप्त केलेले ट्रक
author img

By

Published : Jun 21, 2020, 11:02 AM IST

नंदुरबार - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिल्हाबंदी आहे. मात्र गुजरात राज्यातील निझर गावातून गुजरात राज्यातीलच एका गावात जाण्यासाठी वाळू वाहतूक करणारे ट्रक नवापूर मार्गाचा वापर करत होते. यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नवापूर मार्गे वाहतूक बंदी केली होती. तरीही ट्रक या मार्गावरुन धावत होते. अशा 25 ट्रक नवापूर पोलिसांनी शनिवारी (दि. 20 जून) रोजी जप्त केल्या आहेत.

जप्त केलेले ट्रक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिल्हाबंदी सुरु असल्याने गुजरात राज्यातील सीमेवरील एका गावातून दुसऱ्या गावी जाताना महाराष्ट्रातून जावे लागते. या मार्गावर वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू वाहतूकीची वाहने बायपास मार्गावरुन नेण्यात यावी,अशा सुचना दिल्या होत्या. मात्र ट्रक चालकांकडून या सुचनांना केराची टोपली दाखविण्यात आली होती. सुमारे 25 ते 30 किमीचा अंतर कमी होतो म्हणून ट्रक चालक आपले ट्रक नवापूरमार्गे दामटत होते. अशा 13 ट्रक नवापूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जप्त करून दंडात्मक कारवाई केली होती. मात्र, ट्रक चालक याच मार्गाने ये-जा करत होते. पोलिसांनी नियम मोडून वाळू वाहतूक करणाऱ्या 25 ट्रक जप्त केले आहेत. ही कारवाई पिंपळनेर चौफुली जवळ करण्यात आली.

जप्त केलेली वाहने नवापूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी वसुमना पंत यांनीही वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली होती.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट : शनी अमावस्येनिमित्त इतिहासात पहिल्यांदाच मंदिर बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.