नंदूरबार - वन तस्कराला अटक करण्यासाठी आलेल्या गुजरात राज्यातील उच्छल वन विभागाच्या अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री नवापूर तालुक्यातील नांदवळ गावात ही घटना घडली. वनक्षेत्रपाल गंभीर जखमी असून त्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील उच्छल तालुक्यातील वनक्षेत्रपाल उपेंद्रसिग रावल हे २ वनतस्करांना अटक करण्यासाठी नवापूर तालुक्यातील नांदवण गावात आले होते. मात्र, झटापटीत वनक्षेत्रपाल चांगलेच जखमी झाले. यासंदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात हल्ले खोरांवर गुन्हा दाखल केला असून आरोपी वाड्या नाईक व इलुबाई नाईक यांना नवापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.