ETV Bharat / state

नंदुरबार : 1800 आशा स्वयंसेविका व 180 गट प्रवर्तक महिला कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर - नंदूरबार

आशा प्रवर्तकांना आत्तापर्यंत आलेल्या प्रत्येक सरकारने फक्त आश्वासन दिले व काम करून घेतली. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत देखील आशा वर्कर यांनी आपले कर्तव्य बजावले. कमी मानधनात जास्त काम करून घेतले. तरीदेखील आशा वर्करांनी आपले काम चोखपणे बजावले.

promoter-women-employees
promoter-women-employees
author img

By

Published : Jun 15, 2021, 10:05 PM IST

Updated : Jun 15, 2021, 10:15 PM IST

नंदुरबार - आशा प्रवर्तकांना आत्तापर्यंत आलेल्या प्रत्येक सरकारने फक्त आश्वासन दिले व काम करून घेतली. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत देखील आशा वर्कर यांनी आपले कर्तव्य बजावले. कमी मानधनात जास्त काम करून घेतले. तरीदेखील आशा वर्करांनी आपले काम चोखपणे बजावले. तरीही राज्य शासनाने अशा प्रवर्तकांच्या मानधन व मागण्यांबाबत कुठलाही विचार केला नाही म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील 1800 आशा स्वयंसेविका व 180 गट प्रवर्तक महिला कर्मचारी आजपासून (मंगळवार) बेमुदत संपावर जात आहेत. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.

आशा स्वयंसेविका बेमुदत संपावर

जिल्ह्यातील 1800 आशा स्वयंसेविका व 180 गट प्रवर्तक महिला कर्मचारी संपावर -

महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या कामांची व महिला बालकल्याण विभागाच्या योजनांचे ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तसेच कोरोना काळात प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व सार्वत्रिक कोरोना लसीकरणाला गती देणाऱ्या जिल्ह्यातील 1800 आशा स्वयंसेविका व 180 गट प्रवर्तक महिला कर्मचारी मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर जात असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

मानधन वाढीसाठी जिल्ह्यातील आशा प्रवर्तक बेमुदत संपावर -

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत आशा सेविका महत्त्वाची भूमिका बजावत असताना देखील शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आम्ही आजपासून बेमुदत संपावर जात असल्याचा संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. यामध्ये संघटनेच्या वतीने केलेल्या मागण्यांमध्ये आरोग्यसेविका पद भरतीमध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना 50 टक्के आरक्षण मिळावे. सेविकांना योजनाबाह्य काम सांगू नये. मोबदला शिवाय त्यांच्याकडून कोणतेही काम करून घेऊ नये, प्रेरणा प्रकल्पाच्या रिपोर्टिंग साठी दर सहामाई पंधराशे रुपये मोबदला देण्यात यावा, दरमहा मानधन जमा करताना मोबदला हिशोब पावती देण्यात यावी, थकित मानधन त्वरित देण्यात यावे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानधन दुप्पट करण्याचे आश्वासन पूर्ण करावे, या मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत संपावर जात असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Last Updated : Jun 15, 2021, 10:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.