ETV Bharat / state

राज्यातील अतिदुर्गम नंदुरबारमधील ३ गावांमध्ये 100 टक्के लसीकरण - नंदुरबारमध्ये तीन गावांमध्ये 100% लसीकरण

आदिवासी बहुल भागात लसीकरणाबाबत असलेले गैरसमज आणि अफवा यांच्यावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांनी मात केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या पुरूषोत्तमनगर, सिंदगव्हान आणि सागळी या तीन गावांनी ४५ वर्षावरील लसीकरणाचे उद्दिष्ट १०० टक्के साध्य केले आहे.

तीन गावांमध्ये 100% लसीकरण
तीन गावांमध्ये 100% लसीकरण
author img

By

Published : Jun 12, 2021, 4:55 PM IST

नंदुरबार - राज्यात लसीकरण संथ गतीने सुरू असले तरी आदिवासीबहुल आणि अतिदुर्गम असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये लसीकरणाला नागरिकांकडून प्रतिसाद दिला जात आहे. राज्यात अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाबाबत विविध अफवा ग्रामीण भागात पसरल्या होत्या. आदिवासी बहुल भागात लसीकरणाबाबत असलेले गैरसमज आणि अफवा यांच्यावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांनी मात केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या पुरूषोत्तमनगर, सिंदगव्हान आणि सागळी या तीन गावांनी ४५ वर्षावरील लसीकरणाचे उद्दिष्ट १०० टक्के साध्य केले आहे.

राज्यातील अतिदुर्गम नंदुरबारमधील 3 गावांमध्ये 100 टक्के लसीकरण

लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज
लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये या लसीकरणाबाबत गैरसमज निर्माण झाले होते. लसीकरण केल्यामुळे कोरोना होतो, लस घेतल्यानंतर ताप आला आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले तर तो रुग्ण जिवंत परत येत नाही अशा प्रकारच्या अफवांमुळे सुरुवातीला दिड महिना नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद दिला नाही. त्यांनतर प्रशासनाने नागरिकांच्या मनातील हे गैरसमज दूर करण्यासाठी जिल्ह्यात त्यासंदर्भात बहुस्तरीय जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आणि नागरिक लसीकरण करण्यास उद्युक्त झाले, असे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांनी याविषयी पत्र सूचना कार्यालयाला सांगितले.

लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती

नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत गैरसमज निर्माण झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाची मोठ्या प्रमाणात डोकेदुखी वाढली होती. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने बैठक आयोजित करून जनजागृती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला. या जनजागृती अभियानात जिल्हाधिकारी, खासदार, आमदार आणि इतर वरिष्ठ नेते, अधिकारी यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या व लसीकरणाबाबत नागरिकांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. लसीकरणाबाबत आदिवासींमध्ये असलेले गैरसमज दूर करणाऱ्यांसाठी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी खान्देशी भाषेत व आदिवासी भाषेच्या ऑडीओ क्लिप्स तयार करून दुर्गम भागातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी देखील आदिवासी भाषेत ऑडियो क्लिप्स तयार करून त्या आपल्या मतदार संघातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविल्या.

अफवांबाबत जनजागृत

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत आकाशवाणी, दूरदर्शन यांनी लसीकरणाबाबत वेळोवेळी माहिती देऊन गैरसमज दूर केले. त्याबरोबरच पुण्यातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोतर्फे महाराष्ट्रात कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृतीविषयक व्यापक मोहिमेअंतर्गत 36 जिल्ह्यांत 16 व्हॅन्सद्वारे फिरती बहुमाध्यमी प्रदर्शने आयोजित करण्यात आली. या व्हॅन्सनी प्रत्येक दिवशी सुमारे शंभर किलोमीटर प्रवास करून रस्त्यावरच्या गावागावांमध्ये लस तसेच लसीकरणाविषयी पसरलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनजागृत केली.या उपक्रमाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातही 25 फेब्रुवारी ते 6 मार्च 2021 या कालावधीत लसीकरणाबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात आली होती.

लसीकरणाच्या जनजागृतीसाठी ग्रामपंचायतीतर्फे विविध उपक्रम

अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात लसीकरणासाठी या गावकऱ्यांच्या जनजागृतीसाठी कॉर्नरसभा, ग्रामसभा, दवंडी अशा विविध प्रकारच्या प्रचार साधनांचा वापर तर केलाच शिवाय प्रत्येक गावात ग्रामसेवक, आशासेविका आणि मुख्याध्यापक/शिक्षक यांचे पथक तयार करून त्यांनी घरोघरी भेटी देऊन लोकांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले. याशिवाय गावातील नोकरदार आणि प्रतिष्ठित व्यक्तींना त्यांच्या घरातील व्यक्ती आणि नातेवाईक यांच्याशी याविषयी बोलायला सांगितले. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सदस्यांवर वार्डनिहाय लसीकरण करून घेण्याची जबाबदारी टाकली, असे शेखर रौंदळ यांनी याविषयी सांगितले.

जनजागृती अभियानामुळे लसीकरण शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद

जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून जिल्ह्यात केल्या जाणाऱ्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये लसीकरण शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळाला. नंदुरबार तालुक्यातील सिंदगव्हाण, शहादा तालुक्यातील पुरूषोत्तमनगर आणि नवापूर तालुक्यातील सागळी या तीन गावातील 45 वर्षावरील सर्व नागरिकांचे 100 टक्के लसीकरण झाले आहे, आणखी काही गावात जवळपास 80 टक्के आणि 30 ते 40 गावात 50 टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले.

जिल्ह्यात 100% लसीकरण झालेले पहिले गाव

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथे लसीकरण शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यामुळे शहादा तालुक्यातील पुरुषोत्तमनगर ही जिल्ह्यातील ४५ वर्ष वयावरील शंभरटक्के लसीकरण साधणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. या ग्रामपंचायतीने ४५ वर्षे वयावरील ३६५ नागरीकांची लसीकरणासाठी नोंदणी केली होती. याशिवाय गावातील १८ ते ४५ दरम्यान वयोगटातील २८८ लाभार्थ्यांची नोंदणी देखील या ग्रामपंचायतीने पुर्ण केली आहे. नंदुरबार तालुक्यातील सिंदगव्हाण आणि नवापुर तालुक्यातील सागळी या दोन्ही गावानीही लसीकरणाबाबत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सिंदगव्हाण गावात ४५ वर्षे वयावरील ४३१ नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या तीनही ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींपासुन ते लोकसेवक आणि नागरीकांनी लसीकरणाचे ओळखलेले महत्व अधोरेखीत होते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या तीनही ग्रामपंचायतीमध्ये आज एकही कोरोना रुग्ण नाही. गावात झालेल्या लसीकरणाचा हा शंभर टक्के परिपाक असून यामुळे हे तीनही गाव कोरोनामुक्त झाल्याचे या गावांच्या ग्रामसेवकांनी सांगितले.

तीनही ग्रामपंचायतीतील लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर, नंदुरबार तालुक्यातील सिंदेगव्हाण आणि नवापुर तालुक्यातील सागाळी येथे 45 वर्षीय वरील नागरिकांचे 100% लसीकरण झाल्यामुळे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री के. सी. पाडवी यांच्या हस्ते तिन्ही ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक मुख्याध्यापक व आरोग्य अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा - #Weather update : मुंबईत जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी रस्ते जलमय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.