ETV Bharat / state

नांदेड : हिमायतनगर बसस्थानक परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद - नांदेड गुन्हे वार्ता

आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान महाविद्यालयीन तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या झाल्याची घटना हिमायतनगर शहरातील बसस्थानक परीसरात घडली आहे. या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे.

young man stabbed with knife in nanded
young man stabbed with knife in nanded
author img

By

Published : Sep 11, 2021, 9:45 PM IST

Updated : Sep 11, 2021, 10:46 PM IST

नांदेड - हिमायतनगर शहरातील बसस्थानक परीसरात आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान महाविद्यालयीन तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या झाल्याची घटना घडली आहे. या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे. यश उत्तम मिराशे (१७) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून या घटनेत एकजण जखमी झाला आहे. तर आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे हिमायतनगर येथे दहशतीचे वातावरण पसरले आहे.

व्हिडिओ

किरकोळ वादातून झाली हत्या -

हिमायतनगर तालुक्यातील कार्ला पी. येथील यश उत्तम मिराशे (17) हा हिमायतनगर शहरात शिक्षण घेण्यासाठी दररोज यायचा. पण आज 11 सप्टेंबर रोजी बसस्थानकात अनुज पवणेकर यांच्याशी त्याचा किरकोळ वाद झाला. त्यानंतर अनुजने धारधार शस्त्राने वार करून यश मिराशे यांच्या छातीत वार केला. त्यानंतर हे भांडण सोडविण्याकरिता आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यालाही अनुजने जखमी केले. नंतर तो बोरी रोडच्या दिशेने पसार झाला होता. त्यानंतर उपस्थितांनी यश मिराशे व गंभीर जखमी असलेल्या सोहमला ग्रामीण रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी यशचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

आमदार जवळगावकर यांची घटनास्थळी भेट -

सोहम चायल हा गंभीर जखमी असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. हा सर्व प्रकार शहरातील देवस्थान श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी यासर्व घटनेची माहिती घेण्यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे भेट देऊन युवकांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. त्यानंतर हिमायतनगर पोलिसांनी तत्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.

हेही वाचा - दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप, सायंकाळी ६ पर्यंत ६११६ मूर्तींचे विसर्जन

Last Updated : Sep 11, 2021, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.