नांदेड - शहराच्या इतवारा भागातील शिवनगर परिसरात राहणारा अमोल साबणे या युवकाचा तीक्ष्ण हत्याराने खून करून त्याचा मृतदेह पशुवैद्यकीय रुग्णालय परिसरात असलेल्या झुडपात फेकून देण्यात आला. ही घटना शुक्रवारी दि. २९ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे स्थानकावर काम करून करतात उदरनिर्वाह - इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पशु वैद्यकीय दवाखाना येथील झुडुपांमध्ये एका २३ वर्षीय युवकाचा अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्रांच्या साहाय्याने खून केल्याचा प्रकार रात्री १२ वाजता उघडकीस आला. याप्रकरणी श्याम प्रभू साबणे (रा. शिवनगर इतवारा, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आई वडील, बहीण भाऊ असे सर्व जण एकत्र राहतात. रेल्वे स्थानकावर विविध कामे करून आपले जीवन चालवतात.
नैसर्गिक विधीसाठी गेला झुडपात - २९ एप्रिलला मयत अमोल याचे भाऊ श्याम हे सकाळी कामावर जाण्याच्या तयारीत असताना अमोल साबणे (वय २३) हा नैसर्गिक विधीसाठी पशु वैद्यकीय दवाखान्यातील झुडुपांमध्ये गेला. या दरम्यान श्याम हे कामावर निघून गेले आणि रात्री १० वाजता घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी भाऊ अमोल कामावर का आला नाही अशी विचारणा केली. तेव्हा तो सकाळी नैसर्गिक विधीसाठी गेला आणि परत आलाच नाही, असे सांगण्यात आले. तेव्हा श्याम यांनी त्यांच्या मित्रांसह अमोलची शोधाशोध सुरू केली. मोबाईलच्या बॅटरी उजेडात ते अमोलचा शोध घेत असतानाच त्यांना अमोल मृतावस्थेत पशु वैद्यकीय दवाखान्याच्या झाडा झुडुपांमध्ये पडलेला दिसला. त्याच्या गालावर, छातीवर, दंडांवर, पोटावर धारदार शस्त्रांनी अनेक वार केलेले दिसले.
इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - ही माहिती इतवारा पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अमोल प्रभू साबणे ( २३ ) यास अज्ञाताने २९ एप्रिलला सकाळी १० ते रात्री १० वाजे दरम्यान मारून जखमी करून खून केला असल्याची तक्रार श्याम साबणे यांनी दिली आहे. इतवारा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शेख असद यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
नांदेडमध्ये युवकाचा खून; झुडपात फेकून दिला मृतदेह - नांदेड गुन्हे बातमी
२९ एप्रिलला मयत अमोल याचे भाऊ श्याम हे सकाळी कामावर जाण्याच्या तयारीत असताना अमोल साबणे (वय २३) हा नैसर्गिक विधीसाठी पशु वैद्यकीय दवाखान्यातील झुडुपांमध्ये गेला. या दरम्यान श्याम हे कामावर निघून गेले आणि रात्री १० वाजता घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी भाऊ अमोल कामावर का आला नाही अशी विचारणा केली. तेव्हा तो सकाळी नैसर्गिक विधीसाठी गेला आणि परत आलाच नाही, असे सांगण्यात आले. तेव्हा श्याम यांनी त्यांच्या मित्रांसह अमोलची शोधाशोध सुरू केली. मोबाईलच्या बॅटरी उजेडात ते अमोलचा शोध घेत असतानाच त्यांना अमोल मृतावस्थेत पशु वैद्यकीय दवाखान्याच्या झाडा झुडुपांमध्ये पडलेला दिसला.