नांदेड - हिमायतनगर ठाण्यातील फौजदाराने केलेला अत्याचार आणि सासुरवाडीच्या मंडळीच्या त्रासामुळे थेट पोलीस ठाण्यात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या तरुणाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी तरुणाच्या जबाबावरुन फौजदार ज्ञानोबा काळे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी हिमायतनगर ठाण्यात ठाण मांडून बसलेले आहेत. शहरात परिस्थिती तणावपूर्ण असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
तरुणाने पोलीस ठाण्यातच स्वत:ला घेतले पेटवून; फौजदार काळेसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - police station
हिमायतनगर ठाण्यातील फौजदाराने केलेला अत्याचार आणि सासुरवाडीच्या मंडळीच्या त्रासामुळे थेट पोलीस ठाण्यात अंगावर रॉकेल ओतून पेटून घेतलेल्या तरुणाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी तरुणाच्या जबाबावरुन फौजदार ज्ञानोबा काळे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी हिमायतनगर ठाण्यात ठाण मांडून बसलेले आहेत. शहरात परिस्थिती तणावपूर्ण असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
नांदेड - हिमायतनगर ठाण्यातील फौजदाराने केलेला अत्याचार आणि सासुरवाडीच्या मंडळीच्या त्रासामुळे थेट पोलीस ठाण्यात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या तरुणाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी तरुणाच्या जबाबावरुन फौजदार ज्ञानोबा काळे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी हिमायतनगर ठाण्यात ठाण मांडून बसलेले आहेत. शहरात परिस्थिती तणावपूर्ण असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
नांदेड : हिमायतनगर ठाण्यातील फौजदाराने केलेला
अत्याचार व सासुरवाडीच्या मंडळींच्या त्रासामुळे
थेट पोलीस ठाण्यात अंगावर रॉकेल ओतून पेटून
घेतलेल्या तरुणाची प्रकृती चिंताजनक बनली आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी त्याच्या जबाबावरुन फौजदार ज्ञानोबा काळे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण मांडून बसले आहेत.शहरात परिस्थिती तणावपूर्ण असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.Body:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळीत युवक शे.
सद्दाम शे.अहेमद रा.हिमायतनगर याने नांदेडला न्यायाधीश व पोलिसांच्या समक्ष मृत्यूपूर्व जबानी दिली. त्यानुसार,तो माहेरी गेलेल्या पत्नी व दोन मुलांना आणण्यासाठी सासुरवाडीला गेला असताना त्याचा सासरा,मेहुणा व इतर दोघांनी त्याला मारहाण केली.याबाबतची तक्रार देण्यासाठी आपण हिमायतनगर पोलिस ठाण्यात गेलो असताना संतोष जिचकार याच्या सांगण्यावरून पोलिसांनी तक्रार
घेतली नाही.उलट फौजदार ज्ञानोबा काळे,जमादार संतोष राणे यांनी आपल्याला जबर मारहाण करुन जवळचे जवळची १७ हजार ६०० रुपयांची रोकड आणि ५ ग्रॅम सोन्याची अंगठी काढून घेतली असे शे.सद्दाम से.अहमद यांनी आपल्या जबाबात सांगितले.आपल्याविरुद्ध तक्रार नसताना विचारपूस
करण्यासाठी गेलो असता पोलिसांनी मारहाण केली,
त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी आणि माझी अंगठी व रक्कम आपल्याला परत देऊन न्याय द्यावा. अन्यथा आपण हिमायतनगर पोलीस ठाण्यासमोर जीव देऊ असे निवेदन देऊनही मला न्याय मिळाला नसल्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून रविवारी,१४ जुलै रोजी सायंकाळी काडी लावून पेटवून घेतल्याचे त्याने सांगितले.हा जबाब हिमायतनगर पोलीस ठाण्याकडे रात्री आल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विजय पवार,उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी.मुदिराज यांच्या उपस्थितीत बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास हिमायतनगर पोलीस डायरीत आरपी फौजदार ज्ञानोबा काळे, संतोष जिचकार, संतोष गंगाराम राणे, शे.सिराज शे.सरदार,शे.सरदार, जिशान मिझ या सहा जणांवर कलम ३०६, ३९२, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Conclusion:
तसेच यातील शे.सिराज शे.सरदार, शे.सरदार या दोघांना अटक करण्यात आली असून,अन्य आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. दरम्यान युवकांची
प्रकृती चिंताजनक आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी
रात्रीपासूनच हिमायतनगर पोलीस ठाण्यात सुरक्षेच्या
दृष्टीने राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात
करण्यात आल्या आहेत.