ETV Bharat / state

पंजाबमधील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून महाराष्ट्र-पंजाब सरकारमध्ये जुंपली

नांदेड येथील गुरूद्वारात अडकलेल्या भाविकांना नेण्यासाठी पंजाबवरून आलेल्या वाहन चालकांना प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग झाला असावा. तसेच परतीच्या प्रवासात अनेक भाविकांनाही त्याची लागण झाली असावी, अशी शक्यता पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

Gurudwara Nanded
गुरुद्वारा नांदेड
author img

By

Published : May 3, 2020, 4:13 PM IST

नांदेड - गेल्या चाळीस दिवसापासून हल्ला-महल्लाच्या निमित्ताने पंजाब आणि हरियाणा येथून आलेले शीख बांधव नांदेडमध्ये अडकले होते. बरेच प्रयत्न करून केंद्र सरकार, विविध राज्य शासनाच्या परवानग्या घेऊन सदर यात्रेकरूंची रवानगी पंजाबला झाली. मात्र, पंजाबमध्ये गेल्यानंतर या यात्रेकरूमध्ये ४०० च्या आसपास कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यानंतर त्यांना सोडून आलेल्या चालकांची चाचणी केली असता त्यापैकी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनतर मात्र पंजाब आणि महाराष्ट्र सरकारमध्ये या मुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत.

नांदेड जिल्हा आठवडाभरापूर्वी 'ग्रीन झोन'मध्ये होता. संपूर्ण राज्यामध्ये येथील जिल्ह्याची एक सकारात्मक चर्चा सुरू असताना, दोनच दिवसात २६ रुग्ण आढळल्याने नांदेड जिल्हा चांगलाच हादरून गेला आहे. नांदेड 'कोरोना'च्या चक्रव्यूहात अडकण्यासाठी पंजाब यात्रेकरूंचा विषय मात्र आता ऐरणीवर आला आहे. नेमकी कोरोनाची लागण नांदेडमध्येच झाली, की प्रवासा दरम्यान झाली? नांदेडमुळे पंजाबमध्ये कोरोना गेला की, पंजाबमुळे नांदेडमध्ये आला? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

हेही वाचा... जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी DCP ची परवानगी आवश्यक, सरकारचा निर्णय

पंजाब आणि हरियाणा येथील चार हजार यात्रेकरू हुजूरसाहिबच्या दर्शनासाठी आले असता लॉकडाऊनमुळे चाळीस दिवस नांदेडमध्ये अडकले होते. त्यांना आपल्या गावी परत पाठवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार, पंजाब आणि महाराष्ट्र राज्य सरकारने विशेष प्रयत्न केले. या लोकांना आपापल्या गावी खासगी बसद्वारे पाठवण्यात आले. परंतु पंजाब राज्याच्या सीमेवर त्यांची कोरोना चाचणी केली केली असता आतापर्यंत ४००च्या आसपास यात्रेकरु हे 'कोरोना' पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे. त्यांनतर बस चालकांची चाचणी केली असता, काही चालकांचे रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. आतापर्यंत पंजाबहून प्रवास करून आलेल्या सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर गुरुद्वारा लंगरसाहिबमधील २० सेवेकरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नांदेडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आता पंजाब आणि महाराष्ट्र सरकारमध्ये या विषयावरुन वाक् युद्ध रंगलेसे पाहायला मिळत आहे. दोनही राज्यातील मंत्री तुमच्यामुळेच 'कोरोना'ची लागण झाली असे बोलत, एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

पंजाबचे आरोग्य मंत्री बलवीर सिंग सिद्धू यांची प्रतिक्रिया...

नांदेडमध्ये फक्त तपासणी केली चाचणी नाही : बलवीर सिंग सिद्धू (आरोग्य मंत्री पंजाब)

नांदेडमधून प्रवासाला सुरुवात होण्याआधी यात्रेकरुंची फक्त तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने त्यांची करोना चाचणी केली नाही. म्हणून पंजाब सरकार नाराज आहे. पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग सिद्धू यांनी तसे पत्र लिहून आपली नाराजी महाराष्ट्र सरकारला कळवली आहे. ४० दिवसांपासून पंजाबमधील नागरिक नांदेडमध्ये अडकले होते. पण त्यांची साधी तपासणी देखील सरकारने केली नाही. म्हणून पत्रातून निषेध नोंदवला आहे. आम्हाला त्यांनी सांगितले असते, तर आम्ही आमची टीम तिथे पाठवून कोरोना चाचणी केली असती. पण पंजाब सरकार मात्र कुठल्याही राज्याचा नागरिक असला तरी तपासणी करत आहे, असे सिद्धू यांनी पत्रात म्हटले आहे.

नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया...

नांदेडमध्ये पंजाबच्या यात्रेकरूंना कोरोनाची लागण झाली नाही : पालकमंत्री अशोक चव्हाण

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मात्र यात्रेकरुंना नांदेडमध्ये कोरोना झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, गुरूद्वारात अडकलेल्या भाविकांना नेण्यासाठी पंजाब येथून आलेल्या वाहनचालकांना प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग झाला असावा. तसेच परतीच्या प्रवासात अनेक भाविकांनाही त्याची लागण झाली असावी, अशी शक्यता अशोक चव्हाणांनी व्यक्त केली आहे.

कोरोना झालेल्या २० सेवेकऱ्यांमध्ये विषाणूची लक्षणे नव्हती. २६ एप्रिल रोजी पंजाबहून आलेल्या ७८ बसेसचे प्रत्येकी २ वाहनचालक, कर्मचारी नांदेडला मुक्कामी होते. त्यांनी लंगरमध्ये जेवणही घेतले होते. त्यातून सेवेकऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असावी. २३ एप्रिल रोजी पंजाबला गेलेल्या नांदेडच्या वाहनचालकांना देखील ते परतल्यानंतरच कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते, याकडे लक्ष वेधून चव्हाण यांनी नवीन २३ रूग्णांच्या संक्रमणाचा स्त्रोत नांदेड शहर नसून, तो बाहेर असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पंजाबच्या भाविकांना नांदेडच्या गुरूद्वारात कोरोना झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे.

हेही वाचा... लाॅकडाऊन: रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये 'या' सुविधा सुरू...

गुरूद्वारात इतक्या मोठ्या प्रमाणात लागण झालेली असती, तर नांदेड शहरातही संसर्गाचे तसेच मोठे प्रमाण दिसून आले असते. मात्र, शहरात तशी परिस्थिती नाही. गुरुद्वारामधील बाबांनी देखील या प्रवाशांना नांदेडमध्ये लागण झाली नसल्याचे सांगितले आहे. गुरूद्वारात या भाविकांची नियमित तपासणी सुरू होती. या भाविकांनी नांदेडला असताना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याची किंवा त्रास होत असल्याची तक्रार केली नव्हती. तशी कोणतीही नोंद नाही. तसे असते तर प्रशासनाने त्यांची तातडीने तपासणी करून घेतली असती. त्यांच्यावर उपचार सुरू केले असते, असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.