ETV Bharat / state

दारू दुकान बंद करा; महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या..! - नांदेड जिल्हा बातमी

गावातील देशी दारूचे दुकान बंद करा, या मागणीसाठी धर्माबाद तालुक्यातील नायगाय येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालसमोर आंदोलन केले.

निवेदन देताना
निवेदन देताना
author img

By

Published : Jan 19, 2021, 9:29 PM IST

नांदेड - देशी दारू दुकान बंद करा, अशी मागणी करत महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला. धर्माबाद तालुक्यातील नायगाव या गावातील महिलांनी हे आंदोलन केले.

बोलताना आंदोलक
दुकान नियमबाह्य

शाळा आणि मंदिर परिसरात थाटण्यात आलेले दुकान हे नियमबाह्य आहे, असा दावा या महिलांनी केला आहे. त्याचा वाईट परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांवरही होत आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

नायगाव हे गाव महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील गाव आहे. त्यामुळे धर्माबाद तालुका तसेच तेलंगणातून दारू पिण्यासाठी येथे लोक येतात. या ठिकाणी मद्यपानानंतर अनेक वेळा भांडण होतात. त्यासोबतच घरातील कर्ते पुरुषही दारू पिऊन घरात भांडण करतात, अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून महिलांनी निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.