ETV Bharat / state

'सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामाला लगेच सुरुवात करणार'

महाविकास आघाडी सरकारमध्ये अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार देण्यात आला. पक्षातील नेत्यांनी माझ्या बाबतीत जो निर्णय घेतला, त्या प्रमाणे आपण काम करू अशी, प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

बांधकाम खात्याच्या कामाला लगेच सुरुवात
बांधकाम खात्याच्या कामाला लगेच सुरुवात
author img

By

Published : Jan 5, 2020, 1:50 PM IST

नांदेड - खातेवाटपाचा संपूर्ण अधिकार पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना आहे. त्यांनी माझ्या बाबतीत जो निर्णय घेतला, त्या प्रमाणे आपण काम करू अशी, प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच ते पत्रकारांशी बोलत होते. उद्यापासून लगेचच खात्याच्या कामाला लागणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.

बांधकाम खात्याच्या कामाला लगेच सुरुवात

सार्वजनिक बांधकाम हा विभाग पूर्वी सांभाळला असून, या खात्याचा अनुभव आहे. बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची सोमवारी मुंबईत बैठक बोलावली आहे. चव्हाण यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज नांदेडमध्ये झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. जिल्ह्यातील विविध खात्यांच्या अधिकारी वर्गाची बैठक त्यांनी बोलावली होती. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सगळे मिळून काम करणार असल्याचे चव्हाणांनी सांगितले.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत बोलण्याचे त्यांनी टाळले. तो विषय शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे, मुख्यमंत्री ठाकरे त्यावर निर्णय घेतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Intro:नांदेड : बांधकाम खात्याच्या कामाला लगेच सुरुवात करणार : मंत्री अशोक चव्हाण.

नांदेड : खातेवाटपाचा संपूर्ण अधिकार पक्ष नेत्यांना आहे, त्यांनी माझ्या बाबतीत जो निर्णय घेतलाय, त्या प्रमाणे आपण काम करू अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच ते पत्रकारांशी बोलत होते. आपण लगेच आपल्या खात्याच्या कामाला लागणार असल्याचे देखील चव्हाण यांनी स्पष्ट केल आहे.Body:
सार्वजनिक बांधकाम हा विभाग मी पूर्वी देखील सांभाळलाय, या खात्याचा मला अनुभव असल्याचेही ते म्हणाले. संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांची उद्या मुबईत बैठक बोलावल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, समर्थकांची ईच्छा होती की तुम्ही महसूल मंत्री व्हावे असा प्रश्न विचारला असता, अपेक्षा खूप असतात त्यात काय गैर ,कोणाला मुख्यमंत्री कोणाला पंतप्रधान व्हाव वाटतं .. अपेक्षा मोठी असणे चुकीचं नाही असं चव्हाण यांनी स्पष्ट केलयConclusion:दरम्यान, अब्दुल सतार यांच्या राजीनाम्या बाबत बोलण्याचे त्यांनी टाळलय .. तो विषय शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे, मुख्यमंत्री ठाकरे त्यावर काय ते निर्णय घेतील असं चव्हाण यांनी स्पष्ट केलय. चव्हाण यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज नांदेडमध्ये झाडाझडती घेण्यास सुरुवात केलीय. जिल्ह्यातील विविध खात्यांच्या अधिकारी वर्गाची आज बैठक त्यांनी बोलावली होती. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सारे मिळून काम करु असे बेरजेचे राजकारण चव्हाण यांनी सुरू केल्याने सर्वच कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.