नांदेड - लॉकडाऊनमुळे हतबल झालेल्या महिलांनी मुखेड तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. यामध्ये काही विधवा व निराधार महिलांचा समावेश आहे. त्यांच्यकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे उपलब्ध नसल्याने त्यांना सरकारी मदत मिळत मिळण्यात अडचणी येत आहेत. यामुळे उपासमार होत असल्याने आम्ही जगाव कसं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
मागण्यांचा आग्रह धरत या महिलांनी थेट मुखेड तहसील कार्यालय गाठले. मात्र अद्याप मागण्यांची पूर्तता न झाल्याने त्यांच्यात नाराजी कायम आहे.