ETV Bharat / state

नांदेड शहराला आता होणार ३ दिवसाआड पाणी पुरवठा - ISAPUR DAM

नांदेड शहराला आता होणार तीन दिवसाआड पाणी पुरवठा... विष्णूपुरी, इसापुर प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या अनुशंगाने निर्णय.. इसापुरमधून आसना नदीत आणखी २ आवर्तने सुटणार

३ दिवसाआड पाणी पुरवठा
author img

By

Published : Mar 9, 2019, 8:00 AM IST

नांदेड - आसना नदीत सोडण्यात आलेले इसापूरच्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील पाणी सांगवी जवळील बंधाऱ्यात पोहोचले असून एक दलघमी इतका पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठी नांदेड उत्तर भागासाठी २५ दिवस पुरणार आहे. तर गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पात सध्या ३०.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो मे अखेरपर्यंत पुरण्याची शक्यता आहे. पाणीसाठ्याची परिस्थिती लक्षात घेऊन २ दिवसांऐवजी ३ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची शक्यता महापालिका प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.

३ दिवसाआड पाणी पुरवठा

पाणीपुरवठा विभागाची आयुक्त लहुराज माळी यांनी याबाबात बैठक घेऊन आढावा घेतला. शहराला पाणीपुरवठा करणारी काळेश्वर येथे १, कोटीतीर्थ येथे ४ पंप, तर आसना नदीवर २ पंप आहेत. त्याबरोबर जलशुद्धीकरणाचे काबरानगर येथे दोन नवीन पंप हाऊस आहेत. डंकीन , सिडको आणि असवदन येथे प्रत्येकी एक पंप असून पाच प्रकल्प आहेत.

विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे आसना येथे पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे येथील २ पंप सुरू करण्यात आले आहेत. तर कोटीतीर्थ येथील दोन पंपहाऊस बंद करण्यात आले असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली.

इसापूरची आणखी २ आवर्तने -

नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दर महिन्याला जवळपास नऊ ते दहा दलघमी पाणी लागते. सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता मे अखेरपर्यंत पाणी पुरेल अशी परिस्थिती आहे. तसेच सांगवीला आसनेत पुढील महिन्यात इसापूर प्रकल्पातून आणखी दोन वेळा प्रत्येकी एक दलघमी पाणी मागविण्यात येणार असल्याची माहितीही उपअभियंता सोनसळे यांनी दिली आहे.

Intro:Body:नांदेड शहराला आता तीन दिवसाआड पाणी पुरवठा...

नांदेड : इसापूरच्या उध्वे पैनगंगा प्रकल्पातील पाणी आसना नदीच्या पात्रात सांगवी जवळील बंधाऱ्यात पोहचले असून एक दलघमी पाणीसाठा झाला आहे . सदरील पाणीसाठा नांदेड उत्तर भागासाठी २५ दिवस पुरणार आहे . त्याचबरोबर गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पात गुरुवारी २४ . ५१ दलघमी म्हणजेच ३०.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो मे अखेरपर्यंत पुरण्याची शक्यता आहे . पाणीसाठ्याची परिस्थिती लक्षात घेऊन दोन दिवसांऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची शक्यता महापालिका प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आली आहे ,
पाणीपुरवठा विभागाची आयुक्त लहुराज माळी यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. घेऊन शहराला पाणीपुरवठा करणारी काळेश्वर येथे एक , कोटीतीर्थ येथे चार पंप ; तर आसना नदीवरील दोन पंप आहेत. त्याबरोबर जलशुद्धीकरणाचे काबरानगर येथे दोन नवीन पंप हाऊस आहेत. डंकीन , सिडको आणि असवदन येथे प्रत्येकी असे प्रत्येकी एक पंप असून पाच प्रकल्प आहेत.
विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने व आसना येथे पाणीसाठा उपलब्ध झाल्याने कोटीतीर्थ येथील दोन पंपहाऊस बंद करण्यात आले असून आसना येथील दोन पंप सुरू करण्यात आले असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली.
नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दर महिन्याला जवळपास नऊ ते दहा दलघमी पाणी लागते. सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता मे अखेरपर्यंत पाणी पुरेल अशी परिस्थिती आहे . तसेच सांगवीला आसनेत पुढील महिन्यात इसापूर प्रकल्पातून आणखी दोन वेळा प्रत्येकी एक दलघमी पाणी मागविण्यात येणार असल्याची माहितीही उपअभियंता सोनसळे यांनी दिली आहे .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.