ETV Bharat / state

नांदेड : शहराला गुरुवारपासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा - nanded latest news

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी जलाशयात पाणीसाठा कमी झाल्यामुळे २८ मे पासून शहरातील सर्व भागात ३ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Water shortage crisis in nanded
नांदेड : शहराला गुरुवारपासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा
author img

By

Published : May 27, 2020, 10:18 AM IST

नांदेड - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी जलाशयात पाणीसाठा कमी झाल्यामुळे २८ मे पासून शहरातील सर्व भागात ३ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दरम्यान, याआधी नांदेड शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता.

शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या विष्णूपुरी जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा कमी होत आहे. यामुळे शहराला पाणी कमी पडणार नाही, याची दक्षता घेऊन महानगर पालिकेने शहरातील सर्व भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. मे महिन्यात उष्णतेची तीव्र लाट झाली आहे. सद्या विष्णूपुरीतील पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरावा यासाठी नियोजन जिल्हा प्रशासन करत आहे.

नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. गतवर्षी २०१९ मध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. विष्णूपुरी जलाशयातील पाण्याने तळ गाठला होता. यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याने ६ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यंदाच्या वर्षीय मागील वर्षाच्या तुलनेत पाण्याची टंचाई कमी भासली.

हेही वाचा - नांदेडात सोमवारी उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद; पारा ४५.०५ अंशावर

हेही वाचा - नांदेडात कोरोनाचा सातवा बळी; सोमवारी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.