ETV Bharat / state

नांदेडमध्ये आजपासून मतदार नोंदणी; सर्व मतदान केंद्रांवर चालणार मोहीम - voter

ज्या पात्र मतदरांची नोंदणी काही कारणांनी झाली नाही, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा विचार प्रशासनाने केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
author img

By

Published : Feb 23, 2019, 9:40 PM IST

नांदेड - मतदार यादीत नाव न नोंदविलेल्या पात्र नागरिकांना नाव नोंदविता यावे, यासाठी २३ आणि २४ फेब्रुवारीला नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर नोंदणी करण्यात येणार आहे. सर्व पात्र मतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.

या मोहिमेदरम्यान मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, अनिवासी मतदाराने नमुना ६ अ अर्ज सादर करण्याची आवश्यकता आहे. मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी नमुना ७ अर्ज, मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये करावयाच्या दुरूस्तीसाठी नमुना ८ अर्ज सादर करता येतील. सर्व अर्जांचे नमुने संबंधित मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

१ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित प्रसिद्ध अंतिम मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी मतदान केंद्रावर जावून आपले नाव नोंदवावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र आहे, त्यांनीही आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी. मतदार यादीत नाव नसल्यास या मोहीम कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.

undefined

Intro:नांदेड जिल्ह्यात आजपासून विशेष मतदार नोंदणी मोहिमBody:नांदेड जिल्ह्यात आजपासून विशेष मतदार नोंदणी मोहिम

पात्र मतदारांना पुन्हा एकदा नाव नोंदविण्याची संधी; सर्व मतदान केंद्रांवर चालणार मोहिम

नांदेड: मतदार यादीत अद्याप नाव न नोंदविलेल्या पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदविता यावे, याकरिता शनिवार २३ व रविवार २४ फेब्रुवारी २०१९ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र स्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुणजी डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येत आहे.

आगामी लोकसभा निवडणूका लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला असून पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची पुन्हा एकदा ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रमातंर्गत मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या वंचित नागरिकांना मतदार नोंदणीची संधी मिळावी. यासाठी भारत निवडणूक आयोगाने २३ व २४ फेब्रुवारी रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्र स्तरावर या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, अनिवासी मतदाराने नमुना ६ अ अर्ज, मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी नमुना ७ अर्ज अर्ज, मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये करावयाच्या दुरूस्तीसाठी नमुना ८ अर्ज सादर करता येतील. सर्व अर्जांचे नमुने संबंधित मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

१ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत प्रसिद्ध अंतिम मतदार यादीत नाव नसलेल्या सर्व पात्र नागरिकांनी विशेष मतदार नोंदणी मोहिमे दरम्यान आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जावून आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र आहे, त्यांनीही आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी, मतदार यादीत नाव नसल्यास या मोहिम कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.