नांदेड - रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे हदगाव, हिमायतनगर, उमरखेड, माहूर या तालुक्यांतील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. विदर्भ आणि मराठवाडा सिमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास धनोडा इथल्या पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे. पुलावरून पाणी गेल्यास वाहतूक बंद होऊन मराठवाडा आणि विदर्भ संपर्क तुटू शकतो.
सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पैनगंगा नदीच्या पाण्यात वाढ होत आहे. पैनगंगा नदीवरील तीर्थक्षेत्र माहूर जवळील विशाल नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. वाहनचालकांनी या परीसरात वाहने चालवताना खबरदारी घ्यावी असे आवाहन माहूर प्रशासनाने केले आहे.