ETV Bharat / state

अब्जांश तंत्रज्ञानाद्वारे मातृभाषेत माहिती उपलब्ध होण्यास मदत - कुलगुरू डॉ. उद्धव भोसले

अब्जांश तंत्रज्ञानाद्वारे हे लेखन किंवा संशोधनाची माहिती मातृभाषेत उपलब्ध होण्यास मदत होत आहे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केले.

समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले
author img

By

Published : Aug 23, 2019, 10:28 AM IST

नांदेड - दिवसेंदिवस अनेक विषयावर लिखाण होत आहे. संशोधन होत आहे. पण याचे माध्यम हे तांत्रिक आणि इंग्रजी भाषेमध्ये आहे. ज्यामुळे सर्व सामान्यांना कळणे अवघड आहे. पण अब्जांश तंत्रज्ञानाद्वारे हे लेखन किंवा संशोधनाची माहिती मातृभाषेत उपलब्ध होण्यास मदत होत आहे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केले.

ते गुरुवारी (काल) ऑगस्टला विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये रौप्य महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘अब्जांश तंत्रज्ञान’ विषयाच्या ज्ञानमंडळाचे पालकत्व स्वीकारण्याबाबतच्या सामंजस्य कराराच्या नुतनीकरण समारंभात बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबईचे सचिव डॉ. शामकांत देवरे, अब्जांश तंत्रज्ञान मंडळाचे डॉ. वसंत वाघ, प्र-कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, ‘विज्ञान व तंत्रज्ञान’ विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, ‘मानवविज्ञान’ विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भगवान जाधव, विद्यापीठाच्या अब्जांश तंत्रज्ञानच्या समन्वयिका डॉ. संगीता माकोने यांसह आदी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, जगभरात जास्तीत जास्त लिखाण इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. कारण जास्तीत जास्त देशांमध्ये ही भाषा प्रचलित आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मराठी भाषा प्रचलित आहे. त्यामुळे येथील उपलब्ध ज्ञान हे मातृभाषेत असावे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या सामंजस्य कराराने एकत्रित काम करणार आहेत. नवनवीन निर्मिती होणारे संशोधन, लेखन मातृभाषेतून उपलब्ध झाल्यामुळे सर्वसामान्यापर्यंत ते पोहचले आणि ते त्यांना सहजरीत्या उमजेल. यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. तीन वर्षांपूर्वी हा करार करण्यात आला होता. त्याचे आज नुतनीकरण करून पुढील तीन वर्षे या कराराद्वारे काम करण्यात येणार आहे.

विश्वकोशाच्या नोंदीचे अद्यावतीकरण ही निरंतर चालणारी ज्ञान प्रक्रिया आहे. त्यासाठी आजवरच्या कामाचे परीक्षण करून काळानुसार नोंदींचे पुनर्लेखन करण्याची आवश्यकता आणि नव्या नोंदी लिहिण्याची गरज या सर्व गोष्टींची पूर्तता जलदगतीने पूर्ण करण्याकरिता प्रत्येक प्रमुख विषय-गटातील, उप-विषयातील तज्ज्ञ लोकांचे स्वतंत्र विषयनिहाय ज्ञानमंडळ असण्याची आवश्यकता आहे. नोंदींचे विषय ठरविणे, विषयानुसार विश्वकोशाने निश्चत केलेल्या पद्धतीप्रमाणे नोंद लेखन करून घेणे, तिचे संपादन आणि समीक्षण करणे व प्रकाशित करण्यासठी विश्वकोश संपादकीय मंडळाकडे पाठविणे ही कामे ज्ञानमंडळाच्या माध्यमातून पूर्ण करणे हे ज्ञानमंडळाचे उद्दिष्ट आहे.

याप्रसंगी महराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबईचे सचिव डॉ. शामकांत देवरे, अब्जांश तंत्रज्ञान मंडळाचे डॉ. वसंत वाघ यांचेही मार्गदर्शन झाले. यावेळी प्रस्ताविकेनंतर नामफलकाचे उद्घाटन करून सामंजस्य कराराच्या प्रतींचे देवाण-घेवाण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संगीता माकोने यांनी केले तर आभार प्र. कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी यांनी मानले. यावेळी विद्यापीठ परिसरातील विविध संकुलाचे संचालक, प्राध्यापक, अधिकार, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:अब्जांश तंत्रज्ञानाद्वारे मातृभाषेत माहिती उपलब्ध होण्यास मदत - कुलगुरू डॉ.उद्धव भोसले

नांदेड: दिवसेंदिवस अनेक विषयावर लिखाण होत आहे. संशोधन होत आहे. पण याचे माध्यम हे तांत्रिक आणि इंग्रजी भाषेमध्ये आहे. ज्यामुळे सर्व सामान्य व्यक्तीस अथवा समूहास कळणे अवघड आहे. पण अब्जांश तंत्रज्ञानाद्वारे हे लेखन अथवा संशोधनाची माहिती मातृभाषेत उपलब्ध होण्यास मदत होत आहे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी व्यक्त केले.Body:अब्जांश तंत्रज्ञानाद्वारे मातृभाषेत माहिती उपलब्ध होण्यास मदत - कुलगुरू डॉ.उद्धव भोसले

नांदेड: दिवसेंदिवस अनेक विषयावर लिखाण होत आहे. संशोधन होत आहे. पण याचे माध्यम हे तांत्रिक आणि इंग्रजी भाषेमध्ये आहे. ज्यामुळे सर्व सामान्य व्यक्तीस अथवा समूहास कळणे अवघड आहे. पण अब्जांश तंत्रज्ञानाद्वारे हे लेखन अथवा संशोधनाची माहिती मातृभाषेत उपलब्ध होण्यास मदत होत आहे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी व्यक्त केले.

ते गुरुवार, दि.२२ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये रौप्य महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘अब्जांश तंत्रज्ञान’ विषयाच्या ज्ञानमंडळाचे पालकत्व स्वीकारण्याबाबतच्या सामंजस्य कराराच्या नुतनीकरण समारंभात बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, महराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबईचे सचिव डॉ.शामकांत देवरे, अब्जांश तंत्रज्ञान मंडळाचे डॉ.वसंत वाघ, प्र.कुलसचिव डॉ.रमजान मुलाणी, ‘विज्ञान व तंत्रज्ञान’ विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एल.एम.वाघमारे, ‘मानवविज्ञान’ विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.भगवान जाधव, विद्यापीठाच्या अब्जांश तंत्रज्ञानच्या समन्वयिका डॉ.संगीता माकोने यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे ते म्हणाले, जगभरात जास्तीत जास्त लिखाण इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. कारण जास्तीत जास्त देशांमध्ये ही भाषा प्रचलित आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मराठी भाषा प्रचलित आहे. त्यामुळे येथील उपलब्ध ज्ञान हे मातृभाषेत असावे, त्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या सामंजस्य कराराने एकत्रित काम करणार आहेत. नवनवीन निर्मिती होणारे संशोधन, लेखन मातृभाषेतून उपलब्ध झाल्यामुळे सर्वसामान्यापर्यंत ते पोहचले आणि ते त्यांना सहजरीत्या उमजेल. यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. तीन वर्षापूर्वी हा करार करण्यात आला होता. त्याचे आज नुतनीकरण करून पुढील तीन वर्षे या कराराद्वारे काम करण्यात येणार आहे.

विश्वकोशाच्या नोंदीचे अद्यावतीकरण ही निरंतर चालणारी ज्ञान प्रक्रिया आहे. त्यासाठी आजवरच्या कामाचे परीक्षण करून काळानुसार नोंदींचे पुनर्लेखन करण्याची आवश्यकता आणि नव्या नोंदी लिहिण्याची गरज या सर्व गोष्टींची पूर्तता जलदगतीने पूर्ण करण्याकरिता प्रत्येक प्रमुख विषय-गटातील, उप-विषयातील तज्ज्ञ लोकांचे स्वतंत्र विषयनिहाय ज्ञानमंडळ असण्याची आवश्यकता आहे. नोंदींचे विषय ठरविणे, विषयानुसार विश्वकोशाने निश्चत केलेल्या पद्धतीप्रमाणे नोंद लेखन करून घेणे, तिचे संपादन आणि समीक्षण करणे व प्रकाशित करण्यासठी विश्वकोश संपादकीय मंडळाकडे पाठविणे ही कामे ज्ञानमंडळाच्या माध्यमातून पूर्ण करणे हे ज्ञानमंडळाचे उद्दिष्ट आहे

याप्रसंगी महराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबईचे सचिव डॉ.शामकांत देवरे, अब्जांश तंत्रज्ञान मंडळाचे डॉ.वसंत वाघ यांचेही मार्गदर्शन झाले. यावेळी प्रस्ताविकेनंतर नामफलकाचे उद्घाटन करून सामंजस्य कराराच्या प्रतींचे देवाण-घेवाण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संगीता माकोने यांनी केले तर आभार प्र.कुलसचिव डॉ.रमजान मुलाणी यांनी मानले. यावेळी विद्यापीठ परिसरातील विविध संकुलाचे संचालक, प्राध्यापक, अधिकार, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थिती होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.