ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी ११ ठिकाणी लसीकरण केंद्र

18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना लसीकरणासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून सध्या नांदेड जिल्ह्यात पाच ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

author img

By

Published : May 6, 2021, 12:00 AM IST

Vaccination centers in corona
Vaccination centers in corona

नांदेड - 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना लसीकरणासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून सध्या नांदेड जिल्ह्यात पाच ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालय नांदेड, शहरी आरोग्य केंद्र हैदरबाग नांदेड, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद (ता. धर्माबाद), प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा, प्राथमिक आरोग्य केंद्र अर्धापूर येथे 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीकरण केले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली. लसीची उपलब्धता ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तीच्या लसीकरणाची केंद्रे वाढविण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.

येथे सुरू आहे लसीकरण -

1 मे, 2021 पासून 18 ते 44 वयोगटाच्या व्यक्तींना लसीकरणाची सुरुवात झाली असून जिल्हा रुग्णालय नांदेड येथे 860 लाभार्थ्यांनी शहरी आरोग्य केंद्र हैदरबाग येथे 901 , ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे 855 , प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा 947 , प्राथमिक आरोग्य केंद्र अर्धापूर 877 येथे असे एकूण 4 हजार 440 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. दिनांक 6 मे पासून यात शहरातील सहा नवीन आरोग्य केंद्रावर लसीकरणाची सुविधा उपलब्ध होत आहे. यात शहरी आरोग्य केंद्र कौठा, जंगमवाडी, शिवाजीनगर, शासकीय गुरु गोविंदसिंगजी मेडीकल कॉलेज विष्णुपुरी, शासकीय आयुर्वेदिक कॉलेज , स्त्री रुग्णालय, शामनगर या केंद्राचा समावेश आहे.

ग्रामीण भागात जनजागृती सुरू -

ग्रामीण भागात कोविड -19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामदक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. जनजागृतीसाठी ग्रामीण भागात महाआरोग्य संवाद अभियानाद्वारे प्रचार व प्रसिध्दीसाठी चित्ररथ व विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. याद्वारे ' माझे कुटूंब माझी जबाबदारी ' व ' मी जबाबदार ' ही मोहिम राबविली जात असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी -

ताप, कोरडा खोकला‍ किंवा श्वास घेण्यास त्रास अशी कांही लक्षणे असल्यास आरटीपीसीआर किंवा अँन्टिजेन तपासणी करुन घेण्याचे आवाहन गावोगावी केले जात आहे. वारंवार हात पाणी व साबण वापरुन स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर राखणे, स्वत: आणि इतरामध्ये कमीत - कमी एक मिटर ( 3 फुट) अंतर ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, मास्क वापरणे, श्वसनासंबंधी शिष्टाचार पाळा, जेंव्हा आपल्याला खोकला, शिंक येत तेंव्हा आपल्या तोंडावर व नाकावर रुमाल वापरणे. आपले हात धुणे आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.