ETV Bharat / state

नांदेडच्या महापौरपदी मोहिनी यवनकर तर उपमहापौरपदी मसूद खान यांची बिनविरोध निवड

नांदेड-वाघाळा महापालिकेच्या महापौरपदी मोहिनी येवनकर तर उपमहापौरपदी मसूद खान यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

स्वागत करताना
स्वागत करताना
author img

By

Published : Sep 22, 2020, 7:18 PM IST

नांदेड - नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरपदी मोहिनी येवनकर तर उपमहापौरपदी मसूद खान यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज (दि. 22 सप्टें.) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेऊन ही निवड करण्यात आली आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून महापौर येवनकर यांची ओळख आहे.

बोलताना महापौर यवनकर
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या नगरसेविका मोहिनी विजय यवनकर यांची तर उपमहापौरपदी मसूद खान यांची बिनविरोध निवड झाली आहे. नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेवर सध्या काँग्रेसची एक हाती सत्ता आहे. महापौर पदाचे आरक्षण ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते . राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक विजय यवनकर यांच्या पत्नी मोहिनी विजय यवनकर यांना महापौरपदाची संधी देण्यात आली. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर याचवेळी उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक मसुद खान यांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. भाजपकडून दोन्ही पदासाठी कोणताही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने महापौर आणि उपमहापौर पदी काँग्रेसच्या उमेदवारांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली आहे.महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी 11 वाजता ऑनलाइन विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते . महापौर पदासाठी मोहिनी विजय येवनकर व उपमहापौर पदासाठी मसूद खान यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी डॉ. इटनकर यांनी जाहीर केले. यावेळी आयुक्त डॉ.सुनील लहाने, नगरसचिव अजितपालसिंघ संधू आदींची उपस्थिती होती. महापौर मोहिनी येवनकर व उपमहापौर मसूद खान यांची निवड झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांचाही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. महापौर, उपमहापौरांनी आपल्या पदाचे सुत्रे स्वीकारल्यानंतर काँग्रेसचे आमदार अमर राजुरकर, आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह अनेकांनी त्यांचे स्वागत केले.हेही वाचा - जायकवाडीचे पाणी विष्णुपुरीत; प्रकल्पाच्या नऊ दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.