ETV Bharat / state

नांदेडमध्ये डोळ्यात मिर्चीपूड टाकून सेल्समनला लुटले, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - नांदेड लूटमार

नांदेडमधील असर्जन भागात एका सेल्समनला मिरची पूड टाकून लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे
author img

By

Published : Oct 28, 2019, 12:22 PM IST

नांदेड - शहराला लागून असलेल्या असर्जन भागात रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका सेल्समनला मिरची पूड टाकून लुटल्याची घटना घडली. मात्र, याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांना कसलेही धागेदोरे मिळू शकले नाही. मात्र, दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नांदेड ग्रामीण पोलीस

शहरातील हनुमानगड भागात राहणारा मनोज मधुकर भोसले (वय २८) हा एका कंपनीत सेल्समन म्हणून काम करतो. तो रविवारी सांयकाळी मालवाहू गाडीने माल घेऊन असर्जन भागात गेला होता. तो अंकुश किराणा दुकानासमोर गाडीतील माल देण्यासाठी थांबला असता अज्ञात व्यक्तींनी त्याच्या डोळयात मिरची पूड टाकली. त्याच्याकडील ४५ हजार रुपये रोख व वेगवेगळया बँकेचे २० धनादेश असलेली बॅग हिसकावून दुचाकीवरून लुटमार करणाऱ्या दोघांनी पळ काढला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपीरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक जावेद शेख करीत आहे.

Intro:नांदेड : डोळ्यात मिर्चीपूड टाकून सेल्समनला लुटले.
- पोलिसांना कसलेही धागेदोरे मिळू शकले नसल्याने नागरिकांतून व्यक्त होतोय संताप.

नांदेड : शहरानजिकच्या असर्जन भागात एका
सेल्समनला मिरची पुड टाकून लुटल्याची घटना काल सायंकाळी ७ वाजता घडली मात्र याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांना कसलेही धागेदोरे मिळू शकले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.Body:
शहरातील हनुमानगड भागात राहणारा मनोज मधुकर भोसले (वय २८) हा एका कंपनीत सेल्समन म्हणून काम करतो. काल सायंकाळी पावणे सातच्या
दरम्यान मनोज हा मालवाहू ऑटो (क्रमांक एमएच २६ बीडी ३९०७) सोबत माल घेऊन असर्जन भागात गेला होता.अंकुश किराणा दुकानासमोर मनोज ऑटोतील माल देण्यासाठी थांबला असता अज्ञात व्यक्तींनी
त्याच्या डोळयात मिरची पुड टाकली आणि
त्याच्याकडील ४५ हजार रुपये रोख व वेगवेगळया बँकेचे २० धनादेश असलेली बॅग हिसकावून दुचाकीवरुन लुटमार करणाऱ्या दोघांनी पळ काढला. गजबजलेल्या चौकात घडलेल्या घटनेने मनोज हादरला होता.Conclusion:मनोज भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुध्द गुरनं ५३२/२०१९ कलम ३९२,३४ दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपनिरीक्षक जावेद शेख
करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.