नांदेड - राज्यातील काही जिल्ह्यासह नांदेडमधील काही गावांमध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच बर्ड फ्लूचा अधिक प्रादुर्भाव इतर भागात होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.
बिलोली तालुक्यातील मौजे हूनगुंदा येथे 8 जानेवारीला 2 कावळे व 9 जानेवारीला 3 कावळे व 1 बगळा मृत आढळून आले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्कता घेत पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष उपाययोजना व पथके स्थापन केली होती. 11 जानेवारीला माहूर तालुक्यातील मौजे पापलवाडी येथे 4 कुक्कुट व 3 कावळे व कंधार तालुक्यातील नावंद्याचीवाडी येथे 8 कुक्कुट पक्ष्यांमध्ये मर्तुक आढळले. तर किनवट तालुक्यात 12 जानेवारी रोजी मौजे तल्हारी येथे 9 कुक्कुट व 13 जानेवारी रोजी कंधार तालुक्यातील मौजे चिखली येथे 5 कुक्कुट पक्ष्यांमध्ये मर्तुक आढळले. हे मृत पक्षी पशुसंवर्धन विभागातर्फे पुणे येथील रोग अन्वेषण विभाग व भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था येथे रोग निदानासाठी पाठविण्यात आले होते.
नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव; दोन गावे 'संसर्ग क्षेत्र' जाहीर - नांदेड बर्ड फ्लू न्यूज
बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या ठिकाणापासून 1 किमी त्रिजेच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित ठिकाणी सर्वेक्षण सुरू ठेवण्यात आले आहे.
![नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव; दोन गावे 'संसर्ग क्षेत्र' जाहीर पोल्ट्री फार्म](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10270184-331-10270184-1610821796536.jpg?imwidth=3840)