नांदेड- गुंटकळ विभाग, दक्षिण मध्य रेल्वेमध्ये तिरुपती रेल्वे स्थानकावर दक्षिणकडील भागात यार्ड रेमोडालींग, सिग्नलींग अरेंजमेन्त्स आणि विद्युतीकरणाच्या कार्याकरिता नॉन इंटर लॉक वर्किंग करण्यात येणार आहे. यामुळे बऱ्याच वाहनांवर परिणाम झाला आहे.
नांदेड रेल्वे विभागातील दोन रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर एक रेल्वेचा मार्ग बदलण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
हेही वाचा-अँटिलिया प्रकरणातील तपास अधिकारी एनकाऊंटर स्पेशालिस्ट सचिन वझे कोण?
रद्द करण्यात आलेल्या गाड्या -
1) गाडी संख्या 02765 तिरुपती-अमरावती द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 6 मार्च आणि 9 मार्चला पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.
2) गाडी संख्या 02766 अमरावती ते तिरुपती द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 8 आणि 11 मार्चला पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.
हेही वाचा-विशेष: रेल्वे मार्ग हागणदारी मुक्तीकडे, 75 टक्के नागरिकांकडून शौचालयाचा वापर
मार्ग बदलेली गाडी –
गाडी संख्या 06733 रामेश्वरम ते ओखा साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 5 मार्चला तिच्या नियमित मार्ग काटपाडी-तिरुपती-रेणीगुंठा या मार्गाने न धावता मार्ग बदलून काटपाडी- मेल्पाक्कम- रेणीगुंठा या मार्गाने धावणार आहे. म्हणजेच रेणीगुंठाच्या पुढे ओखापर्यंत ती आपल्या नियमित मार्गानेच धावणार आहे.