ETV Bharat / state

Bike Accident Nanded : नांदेडमध्ये दुचाकीची समोरासमोर भीषण धडक; दोघांचा मृत्यू - नांदेडमध्ये दुचाकी अपघात

नांदेड शहरातील भावसार चौकात सुसाट वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकींचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि.१२) रात्री १२.३० वाजता घडली.

Bike Accident Nanded
नांदेडमध्ये दुचाकी अपघात
author img

By

Published : Feb 12, 2022, 7:12 PM IST

नांदेड - शहरातील भावसार चौकात सुसाट वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकींचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार ( Bike Accident Nanded ) झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि.१२) रात्री १२.३० वाजता घडली.

दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर -

भावसार चौकातून शनिवार रात्री १२.३० वाजेच्या दरम्यान भरधाव वेगाने दोन दुचाकी परस्पर दिशेन जात होत्या. दोन्ही भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकींची आमनेसामने जोराची धडक दिली. दोन्ही दुचाकींचा वेग जास्त असल्याने दोन्ही दुचाकीवरील दुचाकीस्वारखाली पडून गंभीर जखमी झाले. रात्री रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने अपघात ग्रस्तांना वेळेत मदत मिळु शकली नाही. त्यामुळे या दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर असलेल्या प्रतापसिंग जसबिरसिंग लांगरी (रा. कासारखेडा) व श्रीकांत पावडे (रा. नवीनवाडी) यांचा या दोघांचा मृत्यू झाला तर याच घटनेत नौनिहालसिंग धर्मसिंग बुंगई (रा. कासारखेडा) व गणेश शंकरराव पावडे (रा. पावडेवाडी) हे दोघे जण गंभीर जखमी झाले. भाग्यनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची प्राथमिक माहिती घेतली. मृतदेह शववविच्छेदनासाठी पाठविले. शनिवारी दुपारपर्यंत या अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

हेही वाचा - India China Dispute : उणे 40 डिग्री तापमानात ड्रॅगनला नमवण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.