ETV Bharat / state

नांदेड; दुर्गम भागातही कोरोनाचा शिरकाव; रुग्ण सापडल्याने किनवट तालुक्यातील गोकुंदा गाव सील - गोकुंदा कोरोना बातमी

हिमायतनगरच्या कोविड केअर सेंटरमधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील नऊ जणांचे स्वॅब उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा (किनवट) येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरच्यावतीने ७ जुलैला तपासणीसाठी पाठवले होते. ८ जुलैला सकाळी १०.३० वाजता तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, १८ व २० वर्षीय तरूण रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

corona
नांदेड; दुर्गम भागातही कोरोनाचा शिरकाव; रुग्ण सापडल्याने किनवट तालुक्यातील गोकुंदा गाव सील
author img

By

Published : Jul 9, 2020, 12:50 PM IST

नांदेड - किनवट येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील दोन रुग्णांचे कोरोना स्वॅब पॉझिटिव्ह आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. शिवशंकरनगर व पौर्णिमानगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी जाहीर केलेल्या 'ब्रेक द चेन' मधील बाबींचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

हिमायतनगरच्या कोविड केअर सेंटरमधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील नऊ जणांचे स्वॅब उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा (किनवट) येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरच्यावतीने ७ जुलैला तपासणीसाठी पाठवले होते. ८ जुलैला सकाळी १०.३० वाजता तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, १८ व २० वर्षीय तरूण रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित व्यक्तींच्या संपर्कातील दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आल्याने उपविभाग किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी गोकुंदा ग्रामपंचायत हद्दीतील शिवशंकरनगर व पौर्णिमानगर प्रतिबंधित जाहीर केला आहे.

नांदेड; दुर्गम भागातही कोरोनाचा शिरकाव; रुग्ण सापडल्याने किनवट तालुक्यातील गोकुंदा गाव सील

या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या हद्दीमध्ये कुणीही प्रवेश करणार नाही अथवा बाहेर जाणार नाही. तसेच येथील दुकाने पूर्णपणे बंद राहतील. या भागात पूर्णपणे संचारबंदी राहील. अत्यावश्यक सेवा जसे किराणा साहित्य व भाजीपाला, दवाखाना / मेडिकलची आवश्यकता असल्यास ग्रामपंचायत / आरोग्य यंत्रणेमार्फत त्याचा पुरवठा मागणीप्रमाणे सशुल्क करण्यात येईल. या झोनमधील सर्व घरांचे सर्वेक्षण निर्धारीत पूर्ण करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी वैद्यकीय पथक गठीत केले आहे. सदर क्षेत्राच्या चेक पोस्ट प्रवेश व निर्गमन ठिकाणावर आरोग्य विभागातील पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सहवासित व्यक्तींचा तात्काळ शोध घेणे आणि वैद्यकीय पथकाच्या निर्देशाप्रमाणे गृह विलगीकरण, संस्थात्मक विलगीकरण करुन इतर वैद्यकीय कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांना गृह विलगीकरण केलेले आहे, त्या व्यक्तींचा वैद्यकीय अहवाल येईपर्यंत नियमित पाठपुरावा करण्यात यावा. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे उपरोक्त परिसराची संपूर्ण स्वच्छता करुन अहवाल सादर करावा, असेही निर्देश सर्व सबंधित यंत्रणेला दिले आहेत.

या रुग्णांवर वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय पथकामार्फत उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा ( किनवट ) येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोनाबाधित रुग्ण असल्यास आपणास सदर अॅप सतर्क करण्यास मदत करते, असे सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसीलदार उत्तम कागणे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने व पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांनी रुग्ण बाधित परिसराला भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.