ETV Bharat / state

'राजकारण खूप खालच्या पातळीवर गेलंय, 'क्या हम गुलामही अच्छे थे क्या?'' - तुषार गांधी नांदेड लाैे

केवळ खादी घातली म्हणजे गांधी विचाराचे आपण होणार नाही. बापूंची ओळख आपल्या पोशाखाने नाही तर विचाराने होईल, यासाठी आपण काम केले पाहिजे. गांधीजींचे विचार आजही आपल्या जीवनात महत्त्वाचे आहेत का? हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नैतिकतेसाठी आपल्याला न्यायालयाने पायरी चढावी लागत आहे. हे या देशातील नागरिकांसाठी योग्य नाही.

सध्याच्या राजकारणाला जनताच जबाबदार- तुषार गांधी
तुषार गांधी
author img

By

Published : Nov 26, 2019, 9:43 AM IST

नांदेड - सध्या देशात आणि राज्यात राजकारणाचा नंगानाच सुरू असताना देशातील जनता मात्र हे सगळ आंधळी होऊन पाहत आहे. पण अशा काळातही केवळ मतदान करून भागणार नाही, तर नागरिकांनी याकडे उघड्या डोळ्याने पहावे. अजूनही सामान्य नागरिकांतून प्रतिक्रिया उमटत नाहीत. त्यामुळे मला तरी सध्याच्या राजकारणाला जनताच जबाबदार वाटते, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी नांदेड येथे व्यक्त केले.

सध्याच्या राजकारणाला जनताच जबाबदार- तुषार गांधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या १५० व्या जयंती निमित्त आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त तुषार गांधी नांदेड येथे व्याख्यानात बोलत होते. यावेळी गांधी पुढे बोलताना म्हणाले की, केवळ खादी घातली म्हणजे गांधी विचाराचे आपण होणार नाही. बापूंची ओळख आपल्या पोशाखाने नाही तर विचाराने होईल, यासाठी आपण काम केले पाहिजे. गांधीजीचे विचार आजही आपल्या जीवनात महत्त्वाचे आहेत का? हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नैतिकतेसाठी आपल्याला न्यायालयाची पायरी चढावी लागत आहे. हे या देशातील नागरिकांसाठी योग्य नाही. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. राजकारणासह समाजातही नेत्यांचे विभाजन केले जात आहे. जाती-धर्मात विभाजन केले असताना महात्मा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आहोत का? हेही तपासून पाहिले पाहिजे. कुठलाही नागरिक सध्या राज्यातील आणि देशातील अशा पद्धतीच्या राजकारणाचा तमाशा बंद करा म्हणून पुढे आले नाही. हे किती दुर्दैव आहे.

हेही वाचा - संविधान दिनानिमित्त दोन्ही सभागृह एकत्र येणार; कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

राजकारण आता खूप खालच्या पातळीवर गेले आहे, अशी टीका गांधी यांनी यावेळी केली. 'क्या हम गुलामही अच्छे थे क्या?' अशी म्हणण्याची आता वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. सत्यासाठी आता सर्वोच न्यायालयाची पायरी चढावी लागत आहे. आणि त्याकडून प्रमाणपत्र आणावे लागावे लागत आहे. आजच्या काळात सत्याची परिभाषा काय आहे. हेच मूळात समजत नाही. गांधीजींचे मूलभूत तत्वच आता राहिली नाहीत. यशस्वी नेता व्हायचे असेल तर वेगळीच ओळख असावी लागते. आज समाजात नेता व्हीआयपी कल्चरचा झाला आहे. कदाचित आज बापूंनी हे स्वीकारले नसते, अशी भीती वाटते. जनता पण व्हीआयपी कल्चरलाच सलाम करते. पण त्यांच्या कामावर प्रभावित होत नाही. हे लक्षात ठेवा, की गांधीजी पुन्हा येणार नाहीत. आपल्यातूनच कोणाला तरी पुढे यावे लागणार आहे. या देशात आपल्यालाच क्रांती करावी लागेल.

हेही वाचा - '26/11' मुंबईवरील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला 11 वर्षे पूर्ण : अजूनही जखमा ताज्याच

ज्या देशात झुंडबळींचे व्हिडीओ मोठ्या संख्येने पाहिले जातात. त्या राष्ट्राचे भविष्य काय असेल? असे गांधी म्हणाले. या देशातील व्हीआयपीला कुठलीही आचरण नीती नाही. हे या देशाचे दुर्दैव आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. पुढे बोलताना गांधी म्हणाले, की 'महात्मा' हे नाव प्रेरणा देऊ शकत नाही. 'मोहनदास' हे नाव प्रेरणा देणारे आहे. एक सामान्य माणूस कमजोरीला ताकद मानून आपले विश्व निर्माण करेल. मोहनदासला आपली प्रेरणा माना. आपल्या प्रत्येकात एक मोहनदास आहे. आता स्वस्थ बसून विचार करण्याची वेळ नाही. आता घाण साफ करण्याची वेळ आली आहे. समाजातील आणि डोक्यातील घाण अगोदर साफ केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा - 'महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली', राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांचा सन्मान करण्यात आला. माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव शिवाजी गावंडे, नामदेव दळवी, कल्पनाताई डोंगळीकर, शिवानंद सुरकूटवार, देविदास फुलारी, गिता लाठकर, बापू दासरी आदी उपस्थित होते.

Intro:सध्याच्या राज्यातील राजकारणाला जनताच जबाबदार- तुषार गांधी

नांदेड: सध्या देशात व राज्यात राजकारणाचा नंगानाच सुरू असताना देशातील जनता मात्र आंधळी होऊन पाहत आहे. पण अशा काळातही केवळ मतदान करून भागणार नाही तर नागरीकांनी याकडे उघड्या डोळ्याने पाहावे. अजूनही सामान्य नागरिकांतून प्रतिक्रिया उमटत नाहीत. त्यामुळे मला तरी जनताच जबाबदार वाटते असे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी नांदेड येथे व्यक्त केले. Body:सध्याच्या राज्यातील राजकारणाला जनताच जबाबदार- तुषार गांधी

नांदेड: सध्या देशात व राज्यात राजकारणाचा नंगानाच सुरू असताना देशातील जनता मात्र आंधळी होऊन पाहत आहे. पण अशा काळातही केवळ मतदान करून भागणार नाही तर नागरीकांनी याकडे उघड्या डोळ्याने पाहावे. अजूनही सामान्य नागरिकांतून प्रतिक्रिया उमटत नाहीत. त्यामुळे मला तरी जनताच जबाबदार वाटते असे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी नांदेड येथे व्यक्त केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या १५० व्या वर्षपूर्ती निमित्त व स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त तुषार गांधी नांदेड येथे व्याख्यानात बोलत होते. यावेळी तुषार गांधी पुढे बोलताना म्हणाले की, केवळ खादी घातली म्हणजे गांधी विचाराचे आपण होणार नाही. बापूची ओळख आपल्या पोशाखाने नाही तर विचाराने होईल यासाठी काम करा. गांधीजी शिक्षा आजही आपल्या जीवनात महत्व राखते आहे का? हे पाहणेही तितकेच आहे. नैतिकतेसाठी आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागत आहे. हे या देशातील नागरिकांसाठी योग्य नाही. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. राजनीतीसह समाजातही नेत्यांचे विभाजन केले जात आहे. जाती-धर्मात विभाजन केले असताना महात्मा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आहोत का? हे ही तपासून पाहिले पाहीजे. कुठलाही नागरीक सध्या राज्यातील व देशातील अशा पद्धतीच्या राजकारणाचा तमाशा बंद करा म्हणून पुढे आले नाही. हे किती दुर्दैव आहे.
राजकारणात बेशर्मी आणि नालायकीची आता हद झाली आहे अशी टीका केली. क्या हम गुलाम ही अच्छे थे क्या? अशी म्हणण्याची आता वेळ आली आहे. सत्यासाठी आता सर्वोच न्यायालयाची पायरी चढावी लागत आहे. आणि त्याकडून प्रमाणपत्र आणावे लागावे लागत आहे.
दर ब्रेकींग न्यूज ला आता सत्य बदलत आहे. आजच्या काळात सत्याची परिभाषा काय आहे. हेच मूळात समजत नाही. गांधीजींचे मूलभूत तत्वच आता राहिली नाहीत. यशस्वी नेता व्हायचे असेल तर वेगळीच ओळख असावी लागते. आज समाजात नेता व्हीआयपी कल्चरचा झाला आहे. कदाचित आज बापूनाही स्विकारले नसते अशी भीती वाटते. जनता पण व्हीआयपी कल्चरलाच सलाम करते. त्याच्या कामावर प्रभावित होत नाही. जनतेला मूर्ख बनविणे आता सोपे झाले आहे. पण चिंता एकच वाटते स्वतःची आहुती देऊन राष्ट्र निर्माण झाले आहे. त्याचे काय होईल. हे लक्षात ठेवा की गांधीजी पुन्हा येणार नाहीत. आपल्यातूनच कोणी तरी निर्माण कराव लागणार आहे. या देशात आपल्यालाच क्रांती करावी लागेल.
आम्ही लोकशाही आणि स्वतंत्रतेचा पुरस्कार करतो. पण आजच्या शिक्षणात याचा कुठेही उल्लेख नाही. मंत्री आणि बाबू हे शिक्षण पद्धती निश्चित करतात. शिक्षण घेतले म्हणजे सर्वगुणसंपन्न होत नाही. कारकूनची नोकरी पण मिळत नाही. प्रत्येक बाबीचे वेगळा कोर्स झाला आहे. मेरीट सिस्टीम मुळे मेहनती मुले मागे पडत चालली आहेत. जीवनभर गुलामीलाच आम्ही स्वातंत्र्य मानत आलो आहोत. लोकशाहीत तमाशा हा जनतेचा होत आहे. हे कुठे तरी थांबले पाहीजे. तरच गांधींच्या विचाराचे आहोत हे सिद्ध होईल.
सब जायझ लफडो मे होता है... जिंदगी मै नही... नही तो जिंदगी लफडा हो जाती है. असे म्हणाले. ज्या राष्ट्रात माऊन ब्लिचिंग चे व्हिडीओ मोठ्या संख्येने पाहिले जातात. त्या राष्ट्राचे भविष्य काय असेल? असे म्हणाले. कचरा साफ आदतो से बंद होता है. कुठे-कुठे झाडू माडणार असे मत मांडले.
या देशातील व्हीआयपीला कुठलीही आचरण नीती नाही. हे दुर्दैव आहे. अशी टिका केली. त्यामुळे त्यांनी प्रथमतः आचरणात आणणे आवश्यक आहे. त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करू नका.
'महात्मा' हे नाव प्रेरणा देऊ शकत नाही. 'मोहनदास' हे नाव प्रेरणा देणारे आहे. एक सामान्य माणूस कमजोरीला ताकद मानून आपले विश्व निर्माण करेल. मोहनदासला आपली प्रेरणा माना असे म्हणाले. आपल्या प्रत्येकात एक मोहनदास आहे. आता स्वस्थ बसून विचार करण्याची वेळ नाही. आता घाण साफ करण्याची वेळ आली आहे. समाजातील व डोक्यातील घाण अगोदर साफ करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव शिवाजी गावंडे, नामदेव दळवी, कल्पनाताई डोंगळीकर, शिवानंद सुरकूटवार, देविदास फुलारी, गिता लाठकर, बापू दासरी आदी उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.