ETV Bharat / state

नांदेडमध्ये थरार; शहरात गॅंगवार मधून एका गुंडाची हत्या

मंगळवारी रात्री तो घराजवळ थांबला असता दोन दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी त्याच्यावर गोळीबार केला नेम चुकवून विक्की ठाकूर धावत सुटला. आरोपीनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. नंतर त्याच्या शरीरावर तलवारीने अनेक वार करण्यात आले.

गुंडाची हत्या
गुंडाची हत्या
author img

By

Published : Jul 21, 2021, 9:23 AM IST

नांदेड - गँगवार मधून नांदेडमध्ये एका गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आली. दोन दुचाकीवरून आलेल्या अन्य गटातील गुंडानी विक्की ठाकूर नामक गुंडाची गोळ्या झाडून हत्या केली. नांदेड शहरातील गाडीपुरा भागात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. मृत विक्की ठाकूर नुकताच तुरुंगातून जामीनावर सुटला होता. यावेळी संशयिताना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

गॅंगवार मधून एका गुंडाची हत्या

पाठलाग करून गोळ्या झाडल्या
मंगळवारी रात्री तो घराजवळ थांबला असता दोन दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी त्याच्यावर गोळीबार केला नेम चुकवून विक्की ठाकूर धावत सुटला. आरोपीनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. नंतर त्याच्या शरीरावर तलवारीने अनेक वार करण्यात आले. यात विक्की ठाकूर हा जागीच ठार झाला. पुन्हा हवेत गोळीबार करून आरोपी पसार झाले.

बिगानिया गँगने खून केल्याचा संशय
विक्की ठाकूर हा कुख्यात गुंड विक्की चव्हाण याचा साथीदार होता. वर्षभरापूर्वी कैलास बिगानिया नामक गुंडाने विक्की चव्हाण याचा खून केला होता. बिगानिया गॅंगनेच चव्हाण आणि त्याचा साथीदार विक्की ठाकूर याचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे.

मारेकरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
विक्की ठाकूरचे मारेकरी पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत . त्यांची ओळख पटवून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. तसेच दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिली.

हेही वाचा - ऑक्सिजनच्या कमतरतेने मृत्यू झाले नाहीत- आरोग्य मंत्रालयाची राज्यसभेत माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.