ETV Bharat / state

नांदेड: रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी

शहरातील मोर चौक, छत्रपती चौक, तरोडा नाका, राज कॉर्नर, शासकीय विश्रामगृह, महावीर चौक, जुना मोंढा या भागातील मुख्य रस्त्याचा ताबा मोकाट जनावरांनी घेतल्याने त्याचा वाहतुकीला त्रास होत आहे. यामुळे बऱ्याच वेळा रस्त्यावर एकच गोंधळ उडतो. इतकेच नाही तर जनावरांमुळे वाहतूकीची कोंडी होते.

नांदेड: रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे वाहतूकीची कोंडी
author img

By

Published : Aug 26, 2019, 10:35 PM IST

नांदेड - शहरात प्रमुख चौकात जनावरांचा वावर वाढल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे. जनावरे रस्त्यात बसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच मार्गावरुन रुग्णवाहिका येत जात असते. जनावरांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेला बसतो. मनपा प्रशासनाने यावर उपाय योजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

नांदेड: रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे वाहतूकीची कोंडी

शहरातील मोर चौक, छत्रपती चौक, तरोडा नाका, राज कॉर्नर, शासकीय विश्रामगृह, महावीर चौक, जुना मोंढा या भागातील मुख्य रस्त्याचा ताबा मोकाट जनावरांनी घेतल्याने त्याचा वाहतुकीला त्रास होत आहे. यामुळे बऱ्याच वेळा रस्त्यावर एकच गोंधळ उडतो. इतकेच नाही तर जनावरांमुळे वाहतूकीची कोंडी होते. याबाबत मनपा प्रशासनाने ठोस उपाय योजना करावी. अन्यथा पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील काही भागात स्वत:च्या मालकीची जनावरे सुद्धा रस्त्यावर सोडली जात आहेत. महापालिका प्रशासनाकडे अशा जनावरांना कोंडण्याची वेगळी व्यवस्था गोकुळनगर भागात आहे. अशा जनावरांना कोंडल्यानंतर त्यांच्या चारा-पाण्याची योग्य सोय येथे उपलब्ध नसल्याने मोकाट जनावरांना कोंडून काय करायचे. असा प्रश्न मनपा प्रशासनाला पडतो. यामुळे या मोकाट जनावरांवर अंकुश ठेवण्यासाठी मनपा प्रशासन कमी पडत आहे.

दरम्यान, रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या वाहतुकीवर मोकाट जनावरांमुळे परिणाम होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरुन एका दिवसात कमीत कमी २५ रुग्णवाहिका जातात. मोकाट जनावरांनी रस्त्याचा ताबा घेतल्याने या रस्त्यावरुन रुग्णवाहिका नेताना चालकाला कसरत करावी लागते. शहरातील लहान रस्ते, मोकाट जनावरांचा वावर यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते.

Intro:नांदेड : रस्त्यावरील बेवारस जनावरांमुळे अपघाताला निमंत्रण.

- दुचाकी व चारचाकी वाहतुकीला त्रास.

नांदेड : शहरातील प्रमुख चौकात जनावरांचा वावर
वाढल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. तसेच अपघाताचे प्रमाण वाढले आहे.यातील गंभीर बाब म्हणजे जनावरे रस्त्यात बसल्याने वाहतुक कोंडी होते आणि तिथून जाणारी रुग्णवाहिका या ठिकाणी अडकून बसल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता बळावली आहे. यावर मनपा प्र शासनाने कोणतीही उपाय योजना केली नाही.Body:शहरातील मोर चौक, छत्रपती चौक,तरोडा नाका, राज कॉर्नर, शासकीय विश्रामगृह,महावीर चौक, जुना मोंढा भागातील मुख्य रस्त्याचा ताबा मोकाट जनावरांनी घेतल्याने त्याच वाहतुकीला त्रास होत आहे. यामुळे
बऱ्याच वेळा रस्त्यावर एकच गोंधळ उडतो.इतकेच नाही तर जनावरांमुळे वाहतूकीची कोंडी होते. याबाबत मनपा प्रशासनाने ठोस उपाय योजना करावी, अन्यथा पादचारी,ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील काही भागात मालकीची जनावरे सुद्धा रस्त्यावर सोडली जात आहेत महापालिका प्रशासनाकडे अशा जनावरांना कोंडण्याची वेगळी व्यवस्था गोकुळनगर भागात आहे. अशा जनावरांना कोंडल्यानंतर त्यांच्या चारा-पाण्याची योग्य सोय येथे
उपलब्ध नसल्याने मोकाट जनावरांना कोंडून काय करायचे,असा प्रश्न मनपा प्रशासनाला पडतो. या मुळे या मोकाट जनावरांवर अंकुश ठेवण्यासाठी मनपा प्रशासन कमी पडत आहे.Conclusion:रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकी,चारचाकी वाहनांच्या वाहतुकीवर मोकाट जनावरांमुळे परिणाम होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरुन एका दिवसात कमीत कमी २५ रुग्णवाहिका जातात. मोकाट जनावरांनी रस्त्याचा ताबा घेतल्याने या रस्त्यावरुन रुग्णवाहिका
नेताना चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. शहरातील लहान रस्ते, मोकाट जनावरांचा वावर यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.