ETV Bharat / state

नांदेडच्या ग्रामीण भागातील 3 कोरोनाबाधित जिल्ह्याबाहेरुन आलेले; मुंबई, हैदराबाद येथून परतलेले - नांदेड कोरोना लेटेस्ट अपडेट

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. मुखेडचे 2 जण मुंबईवरुन जिल्ह्यात आले तर बिलोलीमधील केरुर येथील एक जण हैदराबादवरुन जिल्ह्यात परतला होता.

nanded corona update
नांदेड कोरोना अपडेट
author img

By

Published : May 22, 2020, 12:35 PM IST

नांदेड- शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी आलेल्या 6 अहवालापैकी तीन अहवाल ग्रामीण भागातील रुग्णांचे आहेत. विशेष बाब म्हणजे हे तिघेही काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात परतले होते. शहरातून ग्रामीण भागात येणाऱ्या व्यक्ती पॉझिटिव्ह निघत असल्याने गावागावात नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे कडक पालन करणे आवश्यक आहे.

मुखेड तालुक्यातील रावनकुळा येथील दोघे कामानिमित्त मुंबईच्या दहिसर भागात वास्तव्यास होते. गावाकडे ते नुकतेच परतले होते. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. घशाचा त्रास आणि ताप दिसून आल्याने मुखेडच्या कोव्हिड रुग्णालयात दाखल करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

बिलोली तालुक्यातील केरुर येथील व्यक्ती हैदराबाद येथून नांदेडला आला. नांदेडला काही काळ वास्तव्य केल्यानंतर तो रिक्षाने नरसीपर्यंत आला आणि तेथून ट्रकने बिलोलीला आला. लक्षणे दिसून आल्याने तो रुग्णालयात दाखल झाला. त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला असता पहिला अहवाल निगेटिव्ह आला. परंतु नांदेडला तो जिथे थांबला तेथील अनेक लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने व लक्षणे सुरु राहिल्याने त्याचा स्वॅब दुसऱ्यांदा तपासणीसाठी पाठवल्यानंतर दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला.

बारड, भोकर आणि मुखेडच्या कोव्हिड रुग्णालयात उपचार घेणारा टेंभुर्णी, (ता. नायगाव) येथील रुग्ण देखील बाहेरुन आलेला आहे. त्यात आणखी तिघांची भर पडली. शहरातून आलेल्या नागरिकांना गावामध्ये क्वारंटाइन करून ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गाव पुढारी व ग्रामस्थांनी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.