नांदेड Hemant Patil Threat Call : 14 डिसेंबर रोजी खासदार हेमंत पाटील दिल्लीमध्ये असताना दहा वाजून आठ मिनिटांनी त्यांना इंग्रजीमधून फोन आला होता. सकृतदर्शनी फोन युनायटेड किंगडममधून आल्याचं दिसत होतं. साधारणतः ५८ सेकंद ती व्यक्ती बोलली होती. '13 डिसेंबर रोजी हिंदुस्तानला आम्ही दाखवून दिलं आहे आमची ताकद. येत्या 26 जानेवारीला आम्ही मोठे धमाके करणार आहोत. यामध्ये तुम्ही स्वतःला वाचू शकत असाल तर वाचून दाखवा' अशा प्रकारची धमकी दिली होती.
हेमंत पाटील यांना तीन कॉल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी योग्य त्या सूचना पोलीस विभागाला दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर 20 डिसेंबर रोजी खासदार हेमंत पाटील यांना तीन कॉल आले होते. यामध्ये हेमंत पाटील यांनी ते कॉल उचलले नाहीत. पण ते कॉल इजिप्त देशातून आले होते. यासंदर्भात लेखी स्वरूपात ही माहिती लोकसभा अध्यक्ष, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि देशाचे गृहमंत्री यांना लिखित स्वरूपात दिली आहे. यासंदर्भात शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना माहिती देण्यात आली असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितलं.
खासदार हेमंत पाटील यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच परिवाराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हेमंत पाटील यांच्या माहितीनुसार, परदेशातून धमकीचा फोन आल्यानंतर या प्रकरणात तपास सुरू आहे - श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक, नांदेड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे. आम्हाला विश्वास आहे की, कोणीही आणि कितीही धमकी दिली तरी आम्ही या धमकीला घाबरणार नाही - राजश्री हेमंत पाटील - पत्नी, खासदार हेमंत पाटील
तीन वेळेस प्राणघातक हल्ले : 38 वर्षाच्या राजकारणामध्ये मोठा काळ हा नांदेड जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे. शिवसेनेचा जिल्हाप्रमुख या पदावर कार्यरत असताना या काळामध्ये तीन वेळेस प्राणघातक हल्ले हेमंत पाटील यांच्यावर झाले होते. नांदेडमध्ये खंडणीखोरी होत होती. नांदेड शहरामध्ये खासगी शिकवणीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेरगावाहून विद्यार्थी येत असतात. या विद्यार्थ्यांचे मोबाईल काढून घेणं, लॅपटॉप काढून घेणं, त्यांना मारहाण करणं अशी कृत्यं करणाऱया मोठ्या टोळ्या होत्या. त्यांना पकडून त्या काळच्या पोलीस अधीक्षकांकडे हवाली केलं होतं. याबाबतचा तपासही नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक करत आहेत. या पार्श्वभूमीवर अधीक्षकांशी चर्चा झाल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिलीय. 14 डिसेंबरला एक वेळेस आणि 20 डिसेंबरला तीन वेळेस धमकीचे कॉल आल्याची माहिती त्यांनी दिलीय.
हेही वाचा -