ETV Bharat / state

खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना धमकीचे पत्र; नांदेडचा डॉक्टर भोपाळ एटीएसच्या ताब्यात

आरोपी डॉ. सय्यद अब्दुल रहेमान याने खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना एक संशयित लिफाफा पाठवला. त्यात आपल्या आई, वडील आणि भावाचे आयसीस आणि इंडियन मुजाहीद्दीन या संघटनेशी संबंध असल्याचा उल्लेख करत धमकी दिली होती.

police station itwara
पोलीस ठाणे इतवारा
author img

By

Published : Jan 18, 2020, 9:03 PM IST

नांदेड - आयसीस आणि इंडियन मुजाहिद्दीन संघटनेच्या नावाचा उल्लेख करत भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना धमकी देणाऱ्या नांदेडच्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सय्यद अब्दुल रहेमान, असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. भोपाळ दहशतवाद विरोधी पथकाने नांदेड पोलिसांच्या मदतीने आरोपी डॉक्टरला देगलूर नाका भागातून ताब्यात घेतले.

खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना धमकीचे पत्र; नांदेडचा डॉक्टर भोपाळ एटीएसच्या ताब्यात

आरोपी डॉ. सय्यद अब्दुल रहेमान याने खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना एक संशयित लिफाफा पाठवला. त्यात आपल्या आई, वडील आणि भावाचे आयसीस आणि इंडियन मुजाहीद्दीन या संघटनेशी संबंध असल्याचा उल्लेख करत धमकी दिली होती. याबाबत खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भोपाळ दहशतवाद विरोधी पथकाकडे तक्रार केली. भोपळ एटीएसने चौकशी करून आरोपी डॉक्टर नांदेडचा असल्याचे निष्पन्न केले.

हेही वाचा - 'कोणाची व्यक्तिगत विधाने सरकारची असू शकत नाहीत'

शुक्रवारी रात्री भोपाळ एटीएसने नांदेड पोलिसांच्या मदतीने आरोपी डॉ. सय्यद अब्दुल रहेमान याला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीचा आपल्या कुटुंबीयासोबत संपत्तीचा वाद आहे. त्यातून आपल्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी तो असे प्रकार करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी देखील त्याने नांदेड पोलिसांना तसेच पत्र पाठवले होते. त्या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल आहे.

Intro:खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना धमकीचे पत्र पाठवणारा नांदेडचा डॉक्टर भोपाळ एटीएसच्या ताब्यात...! 

नांदेड: आयसीस आणि इंडियन मुजाहिद्दीन संघटनेच्या नांवाचा उल्लेख करत भाजपा भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना धमकी देणाऱ्या नांदेडच्या डॉक्टरला अटक करण्यात आली. भोपाळ दहशतवाद विरोधी  पथकाने नांदेड पोलिसांच्या मदतीने आरोपी डॉक्टरला देगलूर नाका भागातुन ताब्यात घेतले. Body:खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना धमकीचे पत्र पाठवणारा नांदेडचा डॉक्टर भोपाळ एटीएसच्या ताब्यात...! 

नांदेड: आयसीस आणि इंडियन मुजाहिद्दीन संघटनेच्या नांवाचा उल्लेख करत भाजपा भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना धमकी देणाऱ्या नांदेडच्या डॉक्टरला अटक करण्यात आली. भोपाळ दहशतवाद विरोधी  पथकाने नांदेड पोलिसांच्या मदतीने आरोपी डॉक्टरला देगलूर नाका भागातुन ताब्यात घेतले.

आरोपी डॉक्टर सय्यद अब्दुल रहेमान याने खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना एक संशयित लिफाफा पाठवला. त्यात आपल्या आई, वडील आणि भावाचे आयसिस आणि इंडियन मुजाहीद्दीन या संघटनेशी संबंध असल्याचा उल्लेख करत धमकी दिली होती. याबाबत खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भोपाळ दहशतवाद विरोधी पथकाकडे तक्रार केली. भोपळ एटीएस ने चौकशी करून आरोपी डॉक्टर नांदेडचा असल्याचे निष्पन्न केले. काल रात्री भोपाळ एटीएस ने नांदेड पोलिसांच्या मदतीने आरोपी डॉ सय्यद अब्दुल रहेमान याला ताब्यात घेतले. दरम्यान आरोपीचा आपल्या कुटुंबिया सोबत संपत्तीचा वाद आहे. त्यातून आपल्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी तो असे प्रकार करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी देखील त्याने नांदेड पोलीसांना तसेच पत्र पाठवले होते. त्या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल आहे. 

बाईट - विजय कुमार मगर -  पोलीस अधिक्षक ,नांदेड Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.