नांदेड- जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 30 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत आलेल्या अहवालात 13 जण पॉझिटिव्ह होते. त्यानंतर आलेल्या अहवालात आणखी 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या 17 पॉझिटिव्ह रुग्णांमधील 13 रुग्ण हे एकट्या मुखेड येथील आहेत. तर चार रुग्ण नांदेड शहरातील असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सहा वाजेपर्यंत 112 नमून्यांचा अहवाल तपासण्यात आला. यामध्ये 89 अहवाल निगेटिव्ह तर 13 अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर दुसर्या टप्प्यात आलेल्या अहवालात 107 नमूने तपासले गेले. यामध्ये 72 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 12 अहवाल अनिर्णित ठेवले गेले, 6 अहवाल नाकारण्यात आले. तर 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात 30 रुग्ण वाढल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 541 झाली आहे. तर आतापर्यंत एकट्या मुखेड तालुक्यात 50 पेक्षा अधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या झाली आहे.
गुरुवारी सर्वाधिक रुग्णांची नोंद.....!
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक 27 रुग्ण हे बुधवारी आढळले होते. गुरुवारी दिवसभराच्या काळात 30 रुग्ण वाढले आहेत.