ETV Bharat / state

Traditional murmurya: नांदेडच्या पारंपरिक मुरमुऱ्याची चवच न्यारी ! - Nanded murmurya News

मुरमुरा तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल येथेच मिळत असल्याने 1980 ते 1995 दरम्यान, शहरात 100 मुरमुरा तयार करणार्‍या भट्टी कार्यरत होते. ( Nanded murmurya ) कालांतराने पाणी कमी झाल्याने येथील भात शेती कमी होत गेली. त्यामुळे आजच्या घडीला शहराबाहेर वसरणी परिसरात जवळपास 9 कारखाने सुरु आहेत.

नांदेडच्या मुरमुऱ्याची चव
नांदेडच्या मुरमुऱ्याची चव
author img

By

Published : Jul 19, 2022, 1:46 PM IST

नांदेड - मुरमुर्‍याचा चिवडा, भेळ, नसुता खाऊ म्हणूनही, अनेकांनी लहानपणी खाल्ले असतील. याशिवाय नुसत्या मुरमुर्‍यावर कच्च तेल टाकून तिखट, मीठ खाल्ले तरी, तोंडाला चव येते. तात्काळ तयार होणारा पदार्थ असून अबालवृद्धांसह सर्वांच्या आवडीचा हा पौष्टिक खाऊ भुरळ घालतो. ( traditional murmurya ) त्यात पारंपारिक पद्धतीने भट्टीवर तयार केलेल्या मुरमुर्‍याची चव न्यारीच असते. ( Nanded murmurya ) नांदेडी मुरमुर्‍याची हीच खासीयत असून मराठवाडा बाहेरही अधिक मागणी होते.

नांदेडच्या मुरमुऱ्याची चव

शहरात 100 मुरमुरा करणार्‍या भट्टी कार्यरत - पाहुण्यांच्या आदरतिथ्यात कितीही बदल झाले तरी, मुरमुर्‍याचे स्थान अनन्य साधारण आहे. मराठवाड्यातील नांदेडमध्येच सध्या मोठ्या प्रमाणात हातभट्टीवर मुरमुरा तयार केला जातो. 50 ते 60 वर्षांची या व्यावसायाला परंपरा आहे. याठिकाणीच पुर्वी साळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होते. मुरमुरा तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल येथेच मिळत असल्याने 1980 ते 1995 दरम्यान, शहरात 100 मुरमुरा तयार करणार्‍या भट्टी कार्यरत होते. ( Nanded murmurya ) कालांतराने पाणी कमी झाल्याने येथील भात शेती कमी होत गेली. त्यामुळे आजच्या घडीला शहराबाहेर वसरणी परिसरात जवळपास 9 कारखाने सुरु आहेत. सध्या छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातून साळ येते. 2 हजार रुपये ते 2200 रुपये क्विंटलचा साळीचा दर आहे. 50 क्विंटल मुरमुर्‍याचे दररोज उत्पादन होते. ( traditional murmurya ) व्यावसायिकांची संख्या कमी असली तरी, येथील उत्पादनाला अमेरिका, युरोपमध्ये तितकीच मागणी आहे, असे येथील व्यावसायिक व्यंकटेश बेजगमवार सांगत आहेत.

वर्षभर टिकतो नांदेडी मुरमुरा - एक क्विंटल नांदेडी मुरमुरा तयार करण्यासाठी 24 तास लागतात. हाताने मुरमुरा तयार केला जात असल्याने तो खाण्यासाठी चविष्ठ आहे. तो चांगल्याप्रकारे फुगतो. शिवाय तो वर्षभर टिकतो. त्याला कोणत्याही प्रकारचा वास येत नाही. ही त्याचे वैशिष्ट्य आहे. भट्टीवर एक क्विंटल मुरमुरा तयार करण्यासाठी दीड हजार रुपये खर्च येतो. तोच मशिनद्वारे करण्यासाठी केवळ 200 रुपये इतका खर्च येतो. मोठी तफावत आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात नांदेडी मुरमुरा बाहेर पाठवता येत नाही, असे व्यावसायिकांनी सांगितले आहे.

कामगारांना प्रोत्साहन दिले पाहिजे - मुरमुरा तयार करणारा वर्ग अत्यल्प आहे. नवीन पिढी यात येणे शक्य नाही. हे मेहनतीचे काम आहे. यामाध्यमातून जवळपास 100 जणांना रोजगार मिळाला आहे. या कामगारांना कोणत्याच सुविधा मिळत नाही. नव्या पिढीला यात उतरण्यासाठी कामगार वर्गाला शासनाने प्रोत्साहान दिले पाहिजे, असे उद्योजक किरण मामीडवार म्हणाले आहेत.

हेही वाचा - Bhupinder singh passes away :अभिनेता आणि चाहत्याकडून गायक भूपिंदर सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.