ETV Bharat / state

महाविहार बावरी नगर येथे उभारला जात आहे देशातील सर्वात उंच अशोक स्तंभ

भारताशिवाय श्रीलंका, मॅनमार व चीन ह्या देशात याप्रकारचे अशोक स्तंभ आहेत. पण एवढ्या उंचीचा अशोक स्तंभ कोठेही नाहीत.

nanded
nanded
author img

By

Published : Jan 28, 2021, 6:04 PM IST

Updated : Jan 28, 2021, 7:30 PM IST

नांदेड - जिल्ह्याच्या वैभवात आणि भव्यतेत आणखी एक सोनेरी पान जोडले जात आहे. नांदेड जिल्ह्यातील बावरी नगर (ता. अर्धापूर) येथे भारतातील सर्वात उंच अशोक स्तंभाची निर्मिती करण्यात आली आहे. ह्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच पूर्णत्वास येणार आहे.

nanded

कुठेही नाही इतका मोठा अशोक स्तंभ

ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात मौर्य सम्राट राजा अशोक यांनी आपल्या राजवटीत अशा स्तंभाची निर्मिती शिलालेख लिहिण्यासाठी केली होती. सारनाथ इथे 50 फूट उंचीचा अशोक स्तंभ आढळतो. भारताशिवाय श्रीलंका, मॅनमार व चीन ह्या देशात याप्रकारचे अशोक स्तंभ आहेत. पण एवढ्या उंचीचा अशोक स्तंभ कोठेही नाहीत.

उंची 65 फूट

बावरी नगर दाभड येथील स्तंभाची निर्मिती डॉ. एस. पी. गायकवाड यांच्या संकल्पनेतून 2012पासून होत आहे. या अशोक स्तंभाची एकूण उंची 65 फूट आहे. ज्याच्या पायासाठी 19 फूट 6 इंचाची मजबूत चिरेबंदी दगडाची पायाभरणी केली आहे. मूळ स्तंभाचे टॉवर 32 फूट आहे व त्यावरील चबुतऱ्याची उंची 33 फूट व वजन 70 टन आहे. ज्यामध्ये स्तंभावर सर्वप्रथम 6 फुटाचे उलटे कमळ आहे. कमळावर 4 फूट उंचीचा हत्ती, घोडा, बैल, सिंह यांची शिल्पे व 4 अशोक चक्र शिल्प कोरली आहेत.

काय आहे प्रतिक?

यातील हत्ती शांतीचे, बैल परिश्रमाचे सिंह शौर्याचे व घोडा हा गतिमानतेचे प्रतीक म्हणून कोरली गेली आहेत. त्यावर 13 फूट उंचीची चारही दिशांना तोंड असणारी भारतातील स्थापत्य कलेचा नमुना दर्शविणारी सिंहाची चार शिल्पे आहेत. शेवटी सर्वात वर 10 फूट उंचीचे 24 अऱ्याचे अशोकचक्र आहे.

मध्य प्रदेश येथून आणला आहे दगड

या स्तंभासाठी मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातून वालुकाष्म दगड आणला गेला आहे. वास्तुकलेचा वारसा दीर्घकाळ टिकण्यासाठी स्तंभाच्या मजबूत जोडणीसाठी पुरातन काळात ज्याप्रमाणे वापरत असत, असे धातू तांबे आणि चुना यांचा वापर करण्यात आला आहे. भारतातील सर्वोत्तम वास्तुकलेचा वारसा देश विदेशातील पर्यटकांच्या पुढील पिढ्यांनाही पाहायला मिळावा, यासाठी मदनंत वास्तू कन्सल्टन्सीने आपले सर्वस्व पणाला लावत देशातील सर्वोत्तम असे वास्तुशिल्पात पारंगत असणारे शिल्पकार देशातील विविध भागात जाऊन शोधले. वास्तुकलेत पारंगत असणारे वाराणसी, सारनाथ, राजस्थान आणि काही स्थानिक, सर्वोत्तम वास्तुशिल्पकारांनी आपले कलाकौशल्य पणाला लावत हे वास्तूशिल्प उभारले आहे.

91 लाख रुपये खर्च अपेक्षित

भारतातील वास्तुकलेचा वारसा जपत पुढील पिढ्यांनाही प्रेरणा मिळेल, असे प्रेरणादायी शिल्प या शिल्पकारांनी उभारले आहे. अशोकस्तंभ उभारण्यासाठी 91 लक्ष रुपये अंदाजित खर्च आहे. सांची येथे असणारी दगडी रेल्लींग आगामी काळात अशोकस्तंभाच्या सभोवती प्रस्तावित आहे. तसेच त्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी कारंजे आणि बगीचाची निर्मिती करण्यात येणार आहे. अशोक स्तंभावर ऊन वारा पाऊस या वातावरणासह प्रदूषणाचा परिणाम होऊ नये व दीर्घकाळ पिढीजात टिकून राहावे, यासाठी त्यावर नॅचरल मीरर पॉलिश करण्यात येणार आहे. कृष्णा कुलकर्णी या अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली वापरत भारतातील वास्तुकलेचा नमुना देश विदेशातील पर्यटकांना पाहायला मिळेल, असे वास्तू शिल्प उभारले आहे.

'ठरेल आकर्षक केंद्र'

गेल्या 33 वर्षापासून वर्षांपासून अखिल धम्म परिषदेचे आयोजन केले जाते. देश-विदेशातून मोठ्या संख्येने उपासक-उपासिका येत आहेत. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू असून खूप मोठे महत्त्व आहे. हा अशोकस्तंभ आगामी काळात महाराष्ट्रातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण केंद्र बनेल, असा विश्वास रवींद्र सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

Last Updated : Jan 28, 2021, 7:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.