नांदेड - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 60 अहवालापैकी 292 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 231 तर अँटिजेन तपासणीद्वारे 61 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 86 हजार 235 एवढी झाली असून यातील 79 हजार 950 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 163 रुग्ण उपचार घेत असून 170 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाने 1772 मृत्यू....!
दिनांक 11, 12 व 13 मे 2021 या तीन दिवसांच्या कालावधीत 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 772 एवढी झाली आहे.
4 हजार 163 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु...!
आज 4 हजार 163 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 129, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 67, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 88, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 28, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 69, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 49, देगलूर कोविड रुग्णालय 10, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 14, बिलोली कोविड केअर सेंटर 90, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 9, नायगाव कोविड केअर सेंटर 8, उमरी कोविड केअर सेंटर 15, माहूर कोविड केअर सेंटर 12, भोकर कोविड केअर सेंटर 2, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 27, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 26, कंधार कोविड केअर सेंटर 5, धर्माबाद कोविड केअर सेंटर 27, मुदखेड कोविड केअर सेंटर 6, अर्धापूर कोविड केअर सेंटर 13, बारड कोविड केअर सेंटर 25, मांडवी कोविड केअर सेंटर 1, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 5, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 13, एनआरआय कोविड केअर सेंटर 1, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 1 हजार 252, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 419, खाजगी रुग्णालय 753 व्यक्ती उपचार घेत आहेत.
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या...!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 36, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 65, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 57, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 29 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती....!
एकूण घेतलेले स्वॅब- 4 लाख 92 हजार 710
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 96 हजार 311
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 86 हजार 235
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 79 हजार 950
एकूण मृत्यू संख्या-1 हजार 772
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.71 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-57
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-248
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 4 हजार 163
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-170
हेही वाचा -उद्या 45 वर्षांवरील लाभार्थ्यांनाच दुसरा डोस; प्रत्येक संस्थेसाठी 100 डोसेसची झाली उपलब्धता