ETV Bharat / state

तथागताचा ‘बुद्ध धम्म’ हा जीवनमार्ग आहे- पूज्य भदंत इन्दवन्श महाथेरो - पूज्य भदंत इन्दवन्श महाथेरो बातमी

महाकारूणिक तथागताचा ‘बुद्ध धम्म’ हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला? किती कळला? किती पुजला ? आणि किती प्रचार-प्रसार केला? यापेक्षा तो आपल्या आचार -विचारांमध्ये किती आला? यालाच अनन्य महत्त्व आहे, असा उपदेश पूज्य भदंत इन्दवन्श महाथेरो यांनी केला.

तथागताचा ‘बुद्ध धम्म’ हा जीवनमार्ग
तथागताचा ‘बुद्ध धम्म’ हा जीवनमार्ग
author img

By

Published : Jan 29, 2021, 10:49 AM IST

नांदेड - तीर्थक्षेत्र महाविहार बावरीनगर दाभड येथे दिनांक 28 जानेवारी रोजी 34 व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला सुरुवात झाली. भदन्त इन्दवन्श महाथेरो यांच्या हस्ते सकाळी धम्मपरिषद परिसरामध्ये पंचरंगी धम्म ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर धम्मदेसना देताना भदंत इन्दवन्श महाथेरो बोलत होते. महाकारुणिक तथागताचा ‘बुद्ध धम्म’ हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला? किती कळला? किती पूजला ? आणि किती प्रचार-प्रसार केला? यापेक्षा तो आपल्या आचार -विचारांमध्ये किती आला? यालाच अनन्य महत्त्व आहे, असा उपदेश पूज्य भदंत इन्दवन्श महाथेरो यांनी केला.

शुद्धाचरणाने आयुष्य सुखकर होण्यासाठी बुद्धधम्म उपयुक्त
भदंत इन्दवन्श महाथेरो यांनी तथागत भगवान बुद्धाने मानव कल्याणासाठी बुद्धधम्म दिला, असे सांगितले. पंचशील तत्वे, आर्यअष्टांगिक मार्ग अनुसरणामुळे जीवनातून दुःखाचा ऱ्हास होण्यास मोठी मदत मिळते. त्याचबरोबर शुद्धाचरणाने आयुष्य सुखकर होण्यासाठी बुद्धधम्म अतिशय उपयुक्त आहे, असेही ते म्हणाले.

तथागताचा ‘बुद्ध धम्म’ हा जीवनमार्ग आहे
पहिल्यांदाच ‘ऑनलाइन’ दूर दृश्य प्रणालीचा वापर दोन दिवस चालणाऱ्या धर्मपरिषदेत पहिल्यांदाच ‘ऑनलाइन’ दूर दृश्य प्रणालीचा वापर करण्यात आला. परिषद स्थळी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतराचे पालन करून उपस्थित जनसमुदाय विद्वान भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा लाभ घेतील, यासाठी आयोजकांनी व्यवस्था केलेली आहे.

पूज्य भिक्खू संघ ऑनलाईन धम्मदेसना देणार

पहिल्या दिवशी सकाळी त्रिरत्न वंदना, परित्राण पाठ, महाबोधी वंदना, धम्म ध्वजारोहण या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री भव्य एलईडी स्क्रीनवर उपस्थित उपासकांना इटली, फ्रान्स, आयर्लंड, श्रीलंका, व्हिएतनाम आणि कंबोडिया आदी देशातील पूज्य भिक्खू संघ ऑनलाईन धम्मदेसना देणार आहे. धम्म परिषदेच्या दुसऱ्या दिवशी उद्या दि. २९ जानेवारी रोजी दिवसभर भगवान बुद्धांच्या उपदेशावर भिक्खू संघाकडून धम्मदेसना दिली जाणार आहे. शनिवारी रात्री या 34 व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचा समारोप होईल, असे महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी स्पष्ट केले. धम्म परिषदेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भिख्खुसंघ उपस्थित झाला आहे.

धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे आयोजन

मुळावा येथील भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेचे मुख्य संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.