नांदेड - नवीन कोरोना स्टेनची चाचणी नांदेड विद्यापीठातील लॅबमध्ये होऊ शकते, असा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. सध्या ब्रिटन आणि इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांच्या स्वॅबचे नमुने पुणे येथे पाठवले जात आहेत. पण नांदेडच्या लॅबमध्येदेखील त्यांचे नमुने अचूक तपासण्याची सुविधा असल्याचे इथल्या तज्ज्ञांनी सांगितले.
विद्यापीठाने स्वतःतयार केली आहे लॅब -
नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पुढाकार घेऊन कोरोना काळात स्वताची लॅब तयार केली होती. विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधीपासूनच लॅब होती. पण मार्च व एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रभाव वाढत होता. स्वॅब तपासणीसाठी रुग्णांचे नमुने पुणे आणि औरंगाबादला पाठवले जात होते. त्याच काळात विद्यापीठाने पुढाकार घेऊन ही लॅब सुरू केली होती.
आतापर्यंत ४० हजारांहून अधिक तपासण्या -
आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर 22 एप्रिलपासून ही लॅब सुरू झाली. आतापर्यंत या लॅबमध्ये 40 हजारांहून अधिक अचूक तपासण्या झाल्या. विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधन करणारे विद्यार्थी आणि काही आरोग्य कर्मचारी गेल्या आठ महिन्यांपासून इथे अविरतपणे काम करत आहेत.
हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळ्यात आणखी एक शिवसेनेचा नेता? भाजपाची चौकशीची मागणी