ETV Bharat / state

K Chandrashekar Rao in Nanded : के. चंद्रशेखर राव यांची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न,  मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - के चंद्रशेखर राव यांची सभा

तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने आपल्या पक्षाचा देशभरात प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रातून सुरुवात केली आहे. अखेर आज चर्तेच राहिलेली के. चंद्रशेखर राव यांची नांदेडमधील हिंगोली गेट परिसरातील मैदानावर पहिली सभा पार पडणार आहे. सीमावर्ती भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती लावतील अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे.

drashekar Rao in Nanded
के. चंद्रशेखर राव यांची नांदेडमध्ये आज जाहीर सभा
author img

By

Published : Feb 5, 2023, 11:23 AM IST

Updated : Feb 5, 2023, 12:30 PM IST

मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : भारत राष्ट्र समितीकडून सीमावर्ती भागातील गावांमध्ये भेटीगाठीचे सत्र अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री केसीआर यांनी देशभर आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जानेवारीतच नांदेडमध्ये सभा होणार होती. परंतु शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे सभा पुढे ढकलावी लागली होती. त्यानंतर ५ फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून बीआरएसच्या अनेक नेत्यांनी या सभेसाठी भरपूर मेहनत घेतली आहे.

२० हजार लोकांची आसन व्यवस्था : या सभेच्या तयारीसाठी पंधरा दिवसांपासून तेलंगणाचे मंत्री, खासदार आमदार हे नांदेडमध्ये तळ ठोकून होते. हिंगोली गेट येथील मैदानावर जवळपास २० हजार लोकांना बसता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याच सभेत जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याशिवाय याच सभेला मनसेकडून विरोध करण्यात येत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पाळेमुळे रोवण्यास सुरुवात : तेलंगणातील भारत राष्ट्र समिती या पक्षाने आता महाराष्ट्राच्या राजकारणात आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली आहे. याचीच सुरुवात म्हणून, 5 फेब्रुवारी रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची नांदेडमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सीमावर्ती भागातील विविध प्रश्न आमि पाणी प्रश्नावर महाराष्ट्रातील नेत्यांना दोषी ठरवत बीआरएस पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात श्रीगणेश करणार असल्याची चर्चा आहे. तर महाराष्ट्रातील सीमा भागांतील मराठी माणसांच्या समस्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांना बीआरएसकडून दोषी ठरवण्यात येत आहे. या गावातील प्रश्न समोर ठेवून ही सभा होणार आहे. ज्यात धर्माबादजवळील बाभळीच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे. पण आता याच सभेला मनसेकडून विरोध करण्यात येत आहे.

शहर झाले गुलाबी : केसीआर यांच्या पक्षाचा झेंडा हा गुलाबी रंगाचा आहे. त्यामुळे हिंगोली गेट मैदान तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या जाण्या-येण्याच्या मार्गावर गुलाबी रंगाचे झेंडे लावण्यात आले आहेत. त्याशिवाय अब की बार किसान की सरकार अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे. के. चंद्रशेखर राव यांना पोलिसांकडून झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. पक्षाचा प्रचार करताना काही अनुचित घटना घडून नये यासाठी प्रशानसाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी पोलिसांची नांदेड शहरात रंगीत तालीम करण्यात आली आहे.

मनसे कार्यकर्त्याना ताब्यात घेतले : ही सभा उधळून लावण्याचा इशारा मनसेने दिला होता. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी बाभळी बंधाऱ्यातील पाणी वाटपाबाबत भुमिका स्पष्ट करावी नंतर सभा घ्यावी, अशी मनसेची मागणी होती. या पार्श्वभूमीवर सभा स्थळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलीसांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना ताब्यात घेतले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे सभेत नागरिकांना संबोधीत करणार आहेत.

हेही वाचा : BRS Nanded: नांदेडची धुरा कुणाकडे येणार? माजी लोकप्रतिनिधींसह सरपंचही लागले 'बीआरएस'च्या गळाला

Last Updated : Feb 5, 2023, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.