नांदेड - सध्या देशभरात हनुमान चालिसा, मशिद भोंग्यावरुन वाद सुरु आहे. याच मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत असतील तर आम्ही कुठंही नमाज पडू, हनुमान चालिसा म्हणू, असे राजू शेट्टींनी म्हटले. माध्यमांशी संवाद साधताना शेट्टींनी राज्यातील महत्वाचे प्रश्न बाजूला पडू लागले आहेत. नको त्या गोष्टींवरुन वाद निर्माण केला जात आहे. त्यातून धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण केलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
भोंगे, नमाज आणि हनुमान चालिसाने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतात का? राजू शेट्टींचा राज ठाकरेंवर निशाणा - नांदेड राजू शेट्टी बातमी
सोयाबीन, कापसाला भाव चांगला मिळाला, परंतु शेतकऱ्यांचे उत्पादन घटल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. विमा कंपन्यांनी सरकारी अधिकारी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून पीक कापणीची खोटे रेकॉर्ड तयार केले. यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळाले नाही. अतिवृष्टीमुळे विमा कंपन्या दिवाळखोरीत निघतील असे असताना विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा नाकारल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.